राजू शेट्टींची आक्रोश पदयात्रा स्थगीत.. !

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

गळीत हंगाम २०२२ -२३ च्या ऊसाला ४०० रुपये . दुसरा हप्ता मिळावा व वजन काटे ऑनलाईन व्हावेत या मागणीसाठी २२ आक्टोबर ते ७ नोव्हेंबर अखेर चालू असलेली आक्रोश पदयात्रा १४ व्या दिवशी आज करमाळे या ठिकाणी सकाळी ११ वाजता पोहोचली . मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी श्री मनोज जरंगे पाटील यांनी उपोषण सुरु करून आज ५ व्या दिवशी तब्बेत खूपच खालावलेने एका बाजूला आपल्या सारखाच एक मराठाआरक्षण मिळावे म्हणून कार्यकर्ता उपोषण करीत मृत्युशय्येवर असताना आपण हार, गुच्छ व फुलांचे उधळणात डुंबून जावे हे मनाला पटले नाही म्हणून, आजपासून पदयात्रेला स्थगिती देवून . मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत आहे असे माजी खासदार राजू शेट्टी यांनी इस्लामपूर येथील शासकिय अतिथी गृहात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहिर केले. ऊस दराचे निर्णय झाले शिवाय कोणतेही साखर कारखाने सुरु करु नये व कारखान्यातून साखर बाहेर सोडू नये असे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना श्री शेट्टी यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष