बोरगांव भाजपा कमिटी कडून उद्या जनरल बैलगाडी व घोडागाडी शर्यत मैदान
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगांव ता. निपाणी येथे चिक्कोडी लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार मा. श्री. आण्णासाहेब शंकर जोल्ले यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त समस्त भाजपा कार्यकर्ते यांच्या वतीने भव्य जनरल बैलगाडी व घोडागाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि ६ रोजी सकाळी १० वाजता घोडागाडी शर्यत, जनरल बैलगाडी शर्यत कर्नाटक प्रोसेस, इचलकरंजी रोड, बोरगांव. या मैदानात सोडण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार आण्णासाहेब शंकर जोल्ले आणि आमदार शशिकला जोल्ले यांच्या हस्ते होणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा