गुरुजनांकडून सत्कार हा मोठा सन्मान : ज्येष्ठ पत्रकार गणपती कागे

 


अकिवाट / शिवार न्यूज नेटवर्क :

श्री साई समर्थ फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार अकिवाट मधील ज्येष्ठ पत्रकार गणपती कागे यांना नुकताच मिळाला. त्याबद्दल पंचक्रोशीतील गुरुजनांच्याकडून सत्कार करण्यात आला.त्यावेळी सत्काराला कृतज्ञतापूर्वक उत्तर देताना ते पुढे म्हणाले,आयुष्यात विविध क्षेत्रात कार्य करताना शिक्षण क्षेत्रात जी आपुलकी,प्रेम मिळाले आहे. गोरगरिबांची मुले शिकली पाहिजेत.हा उदेश्य मनात ठेवून कार्य करीत राहिलो. त्या चिमुकल्यांच्या शुभेच्छा व गुरुजनांचा आशिर्वाद यामुळेच हा पुरस्कार मिळाला. असे समजतो.आपल्या सारख्या गुरुजनांकडून झालेला सत्कार हा मोठा सन्मान आहे.

             दिलीप शिरढोणे गौरव करताना म्हणाले -गणपती कागे यांची लेखणी सर्वसामान्य बहुजनांच्या कल्याणासाठीच वापरलीआहे.पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यात ही आपला ठसा उमटविलेला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेवून राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळालेबद्दल अभिमान वाटतो.

       साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेचे व्हा.चेअरमन मेहबूब मुजावर म्हणाले,जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी गणपती कागे यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे.गोरगरीबांच्या मुलांच्या शाळा वाचविण्यासाठी केलेली धडपड वाखाणण्याजोगी आहे.

          याप्रसंगी उर्दू शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष महंमदहनिफ मुल्ला,राजेश खन्ना पानारी,बाळासो कोळी,अल्लाबक्ष नदाफ,अशोक कोळी,विनोद माने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष