बालाजीमध्ये शालेय पोषण आहारांतर्गत इडली - सांबरचा समावेश

इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

येथील श्री बालाजी माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना (शालेय पोषण आहार) या अंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम म्हणून प्रशालेमध्ये संस्थेचे अध्यक्ष मा. मदनराव कारंडेसाहेब यांच्या संकल्पनेतून व प्रेरणेतून इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या एकुण 1800 विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहार म्हणून दर शनिवारी इडली सांबर देण्याच्या उपक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद कोल्हापूर माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी मा. श्री. गजानन उकिर्डेसाहेब तसेच वेतन पथक व भविष्य निर्वाह निधी पथक कोल्हापूर या विभागाचे अधिक्षक मा. प्रविण फाटक साहेब यांच्या शुभ हस्ते तर संस्थापक अध्यक्ष मा. मदनराव कारंडेसाहेब, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. मंजूषा रावळ मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर नारायणकर सर, श्री. बालाजी विद्यामंदीरच्या मुख्याध्यापिका सौ. निशा सुर्यवंशी मॅडम या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना इडली-सांबर वाटप करण्यात आले.

सदर उपक्रमासाठी वर्षा इंडस्ट्रीज गोकुळ शिरगाव यांचेकडून अत्याधुनिक इडलीस्टिमर दोन मशिन आणल्या आहेत, या मशीनचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. प्रशालेच्या मुख्याध्यापिका यांच्या सुयोग्य नियोजनामधून व शालेय पोषण आहार प्रमुख श्री. बाबासो माळी सर, कु. व्ही. डी. रगडे मॅडम, श्री. सुधाकर शिंदे सर व इतर शिक्षकांच्या सहकार्यामुळे सदरचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. सदरच्या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गात आनंदाचे वातावरण होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष