मराठा आरक्षण : एकजुट होऊन आंदोलनात सहभागी व्हा : सुरेशदादा पाटील

 


इचलकरंजी / शिवार न्यूज नेटवर्क :

मराठा आरक्षणाचा प्रश्न पुनश्च एकदा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्यापही सुटलेलला नसून केवळ आश्वासनांशिवाय काहीच मिळत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाने एकजुट होऊन सामील व्हावे. मराठा आरक्षणासाठी सातत्याने झटणाऱ्या महाराष्ट्र क्रांती सेना पक्षसुध्दा सहभागी होत आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत गावागावात साखळी उपोषण सुरु करण्यात यावे, असे आवाहन महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

ते म्हणाले, मराठा आरक्षण हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलेला आहे. मराठा समाजाचा ५० टक्के ओबीसीमध्ये समावेश करावा ही मागणी रास्त असून त्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाची सातत्याने मागणी आहे. त्यासाठी मागील २० वर्षापासून विविध मार्गाने आंदोलने करण्यासह लेखी स्वरुपातील अनेक निवेदने देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष