कोणी घर देता का घर ,कसनाळातील कमल भगत कुटंबाची सरकारकडे आर्त हाक..!
घेतला भाड्याच्या घराचा आसरा, प्रशासन लक्ष देत नसल्याने आत्महत्या करण्याची खंत
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
कसनाळ तालुका निपाणी येथील भर पावसात राहते घर पडले ,घराच्या भिंती खाली सापडून जावेची दुभती म्हैस दगावली त्यामुळे कमल आनंद भगत कुटुंबिय वाऱ्यावर पडले आहे. एक वर्षाचा कालावधी लोटला तरीही सरकारने कोणतीच मदत अगर घर मंजूर केले नाही .त्यामुळे भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे . तलाठी,पिडीओ ,महसूल खाते ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी यांच्याकडे ये-जा करुन चप्पल फाटले तरीही कोणी दाद घ्यायला तयार नसल्याने भगत कुटुंबियाना कोणी घर देता का घर अशीच अवस्था झाली आहे.सरकार घर मंजूर करीत नसल्याने आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची खंत कमल भगत यांनी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती की मुसळधार पावसामध्ये कमल आनंद भगत या विधवा महिलेचे राहते घर कोसळले. या घराच्या ढिगार्याखाली शालन भगत यांची म्हैस मृत्युमुखी पडली आणि भगत कुटुंबाचा संसार आजही उघड्यावर आहे. राहायला घर नाही उदरनिर्वाह करायला साधन नाही सरकार काहीतरी करेल या आशेवर गेले वर्षभर वाट पाहिली पण त्यांच्याकडूनही काहीच काम झालं नाही .पावसाळा मध्ये पडझड झालेल्या घरांची वर्गवारी करुन इतर गावांतील पडलेल्या घरांना ५० हजार पासून ०५,लाखा पर्यंत निधी चिरमिरीवर संबंधितांनी मंजूर करुन दिली आहेत . यामध्ये काही पीडीओ, तलाठी व संबंधितांनी अर्थ पूर्ण ढपला पाडला असल्याची कुजबुज सुरु आहे.पण गरीब कमल भगत या विधवा महिलेची समस्या व घर मंजूर करण्याची कोणीही तसदी दाखवली नाही त्यामुळे आजही त्यानी भाड्याच्या घरामध्ये संसार थाटला आहे. राहयला घर नाही, दुसऱ्याच्या बांधावर जाऊन मोल मजूरी करावी लागते आहे. मुलगा इचलकरंजीत कामावर जातो खर्चाचा ताळमेळ घालता त्यांना स्वतः घर बांधणे अवघड असल्याने मुलाचे लग्न थांबले आहे. त्यामुळे अशा कुटुंबाकडे लक्ष देण्यास कुणाला वेळ नाही.गरीबाला कोणी वाली नाही असाच प्रत्यय या भगत कूटुंबाला आला आहे.अजुन किती वर्षे घराची प्रतिक्षा या कुटुंबाला करावी लागणार हे येणारा काळच सांगेल.लोकप्रतिनिधी व सरकारने चाल ढकल चालवले असुन प्रशासन आमच्याकडे बघत नसेल तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय गत्यंतर नाही अशी खंत या कमल भगत व मुलगा यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सरकार आता तरी त्यांच्या समस्या कडे लक्ष देणार की जीव गेल्यावर घर मंजूर करणार असा संतप्त सवाल कसनाळ ग्रामस्थांमधून व्यक्त केला जात आहे.
चिरमिरीवर घरांची वर्गवारी
पाऊस असेल किंवा पूरानी पडलेली घरांची नुकसानभरपाईची वर्गवारी अनेक ग्रामपंचायती मध्ये झाली खरी पण जे मूळ लाभार्थी वंचित राहिले आहेत.अनेकानी जुनी घरे पाडून चिरमिरी देऊन निधी मंजूर करून घेतला आहे.संबधितानी लाच घेऊन घरे मंजूर केल्याचा आरोप जनतेमधुन होत आहे.पण ज्यांना योजनेची माहिती नाही ते लाभार्थी अजून ही घरांच्या प्रतिक्षेत आहेत.पण जे सेटलमेंट करून ५०हजार ते पाच लाखांची घरे चोरी चोरी चुपके चुपके अर्थ देऊन मंजूर करुन घेतली आहेत.त्यामुळे मूळ लाभार्थी घरांच्या शोधात असल्याचे चित्र अजुनही परिसरात पहावयास मिळते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा