मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिरोळ शहराध्यक्ष दिग्विजय माने यांचा राजीनामा
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
मराठा समाजास आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी सरकार उदासीन असल्यामुळे मराठा समाजाचा आरक्षण प्रश्न निकाली लाऊ शकत नसल्याचे दिसून येत आहे. केंद्र व राज्य सरकारचे उदासिन धोरण, मराठा आरक्षण समाजासाठी मोठा प्रश्न बनला आहे. मी समजाचे देणे लागतो. मराठा या नात्याने पक्षात राहून काम करण्याचा नैतिक अधिकार नाही असे स्पष्ट करत रविवारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शिरोळ शहराध्यक्ष दिग्विजय संपतराव माने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
दिग्विजय माने यांनी मराठा समाजाला आपला पक्ष मानतो आणि मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे सुपूर्त करून मराठा आरक्षण लढ्यात सहभाग घेऊन कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला असून जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून काम न करण्याचा निश्चय केला आहे मराठा समाज हाच माझा पक्ष एक मराठा लाख मराठा मिशन मराठा आरक्षण यासाठीच आपण प्रयत्नशील राहू असे स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा