आलास -अकीवाट कृष्णा नदीवरील पुलासाठी 23 कोटीची निविदा प्रसिद्ध : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
आलास अकीवाट दरम्यान आलास येथून प्रजिमा 23 पासून आलास, अकीवाट, गुरुदत्त साखर कारखाना, टाकळी वरून प्रजिमा 38 ला मिळणारा 4.800 लांबी असलेल्या रस्त्यासाठी प्रजिमा 103 वर आलास गावानजीक कृष्णा नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 23 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे,
शिरोळ तालुक्यातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मार्गावर दळणवळणासाठी कृष्णा नदीवर पूल व्हावा अशी अनेक वर्षाची या परिसरातील नागरिकांची मागणी होती, मंत्री स्तरावर याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या पूल उभारणीच्या कामाला मंजुरी दिली होती, या मार्गाचा सर्वे केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरोळ तालुक्यातील या मोठ्या पुलाच्या कामाची निविदा शुक्रवारी प्रसिद्ध केली असल्याने लवकरच आलास अकीवाट दरम्यान कृष्णा नदी पात्रावरती या पुलाच्या कामाची सुरुवात होणार आहे असेही आमदार राजेंद्र पाटील यांनी म्हंटले आहे.
हा पूल उभारण्यासाठी मंजुरी व निधीची तरतूद केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा