सदलगा शहरातील समुदायभावनासाठी सतीश जर्किव्हळी फाउंडेशन च्या वतीने 50 खुर्च्या व साऊंड सिस्टिम भेट.
अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :
बेळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष युवा नेते श्री राहुलअण्णा जारकीहोळी यांनी चिकोडी येथील काँग्रेस भवन येथे तालुक्यातील विविध समुदाय मंडळांना सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने समाज भवन कार्यक्रम उपयोगी साहित्याचे वाटप केले.
चिकोडी तालुक्यातील अनेक समुदायांना आपल्या समाज भावनांमध्ये कार्यक्रमाप्रसंगी उपयोगी पडणारे साहित्य म्हणजे खुर्च्या व साऊंड सिस्टिम साहित्य राहुल जारकीहोळी यांनी आपल्या सतीश अण्णा जारकीहोळी फाउंडेशनच्या माध्यमातून वाटप केले. यामध्ये सदलगा शहरातील समुदाय भवनासाठी व समुदाय भवनातील कार्यक्रमासाठी उपयोगी पडणारे साहित्य म्हणजे पन्नास खुर्च्या व साऊंड सिस्टिम चे साहित्य कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिकोडी तालुक्याचे अध्यक्ष श्री लक्ष्मणराव चिंगळे व एस सी एस टी प्रवर्ग संचालक श्री जीवन मांजरेकर यांच्या उपस्थितीत संबंधितांना प्रदान करण्यात आले. याप्रसंगी सदलगा शहरातील समस्त बौद्ध समुदायाच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा