हेरवाडमध्ये ५ एकर ऊस जळून खाक ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील हराळे मळा - लाट शिव येथील सुमारे ५ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली आहे. सदरची आग ही शॉर्टसर्किटने लागल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, हेरवाड येथील हराळे मळा - लाट शिव येथे असणार्या ऊसाच्या फडास अचानक आग लागली. बघता - बघता आगीने रौद्ररूप धारण केले यावेळी सुमारे ५ एकर ऊस जळून खाक झाला. यावेळी शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखल्याने उर्वरित क्षेत्र जळण्यापासून वाचले. या आगीमध्ये अशोक पाटील, सुकुमार कुन्नुरे, मारुती हराळे, शिवनू आलासे, काशिनाथ पाटील, आप्पासाहेब धामणे शेतकऱ्यांचे ऊस जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा