अभिवृद्धी संघ सदलगा संचालित दुग्ध व्यवसायिक संघ संस्थेकडून उच्चांकी फरक वाटप

 


अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :

चिकोडी तालुक्यातील सदलगा शहर व आजूबाजूच्या खेड्यातील दूध उत्पादकांना आदर्श ग्रामीण अभिरुद्धी संघ सदलगा संचलित दुग्ध व्यवसाय संस्थेकडून दूध उत्पादकांना सर्वाधिक दूध फरक फरकाचे आणि चालू वर्षात आकस्मिक गाय व म्हैस मृत्युमुखी पडलेल्या दूध उत्पादकांना अर्थसाह्याचे वाटप आज करण्यात आले.

या आदर्श संस्थेने आतापर्यंत सर्वात जास्त दूध फरक बिलाचे वाटप अनेक वर्षे करून, आपली "आदर्श" परंपरा यावर्षीही परंपरेप्रमाणे जोपासली आहे.

 यावर्षी आपल्या 130 सभासदांना आर्थिक मदत व दूध फरक बिलापोटी सात लाख रुपयाचे वाटप आज करण्यात आले. म्हैस दूध दर फरक प्रति लिटर दोन रुपये पन्नास पैसे तसेच गाय दूध दर फरक प्रति लिटर एक रुपये पन्नास पैसे याप्रमाणे संस्थेचे प्रेरणास्थान श्री राजू अण्णा कलाजे, संस्थेचे संस्थापक श्री बाहुबली कलाजे ,संस्थेचे अध्यक्ष रामू कलाजे यांच्या हस्ते दूध उत्पादकांना वितरित करण्यात आले.

संस्थेला सर्वाधिक म्हैस दूध पुरवठा करणारे दूध उत्पादक- शरद इंगळे, सौ अक्काताई कुंभार, गंगाराम मगदूम, संतोष जाधव, शिवू बत्ते ,शंकर डांगे. त्याचप्रमाणे सर्वाधिक गाय दूध पुरवठा करणारे श्री शरद इंगळे, राहुल पिरगांन्नावर, सागर माळगे, राजू शिंगाडे, शिव हुद्दार, महादेव मुडलगी. या सर्व दूध उत्पादक सभासदांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह आणि फरक रकमेचा चेक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी या वर्षात दुग्ध व्यवसायिकांचे पशुधन म्हणजे गाय आणि म्हैस या अचानक मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाचे मालक श्री शरद इंगळे, चंद्रशेखर नडूमनी, महादेव कोळीकरी, राजू शिंगाडे, आनंद खोत. यांना प्रत्येकी 5000 रुपयाचा आर्थिक साह्याचा धनादेश संस्थेचे मान्यवर संचालकांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे मान्यवर श्री भरतेश उदगावे, सम्मेद कलाजे संस्थेचे सचिव संतोष करगावे, सुरज मडिवाळ ,प्रज्वल हुद्दार. यांच्यासह अनेक दूध उत्पादक सभासद संस्थेच्या कार्यालयात कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व उपस्थितांना अल्पोपहार देण्यात आला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष