शिरोळ तालुक्यातील शिरोळ, नांदणी, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, कुरुंदवाड व दत्तवाड सर्कलचा दुष्काळ सदृश्य भागांमध्ये समावेश : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
गत हंगामात अत्यल्प झालेल्या पावसामुळे शिरोळ तालुक्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, या सर्व गावांचा समावेश दुष्काळ सदृश्य गावांमध्ये करावा अशी मागणी शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासनाकडे केली होती, या मागणीची दखल घेताना वस्तुस्थितीची पाहणी करत शासनाच्या महसूल विभागाने या सर्व विभागाचा आणि या परिसरात पडलेल्या पावसाचा अहवाल शासनाकडे सादर केला होता त्याची दखल घेताना महाराष्ट्र शासनाने शिरोळ तालुक्यातील शिरोळ, नांदणी, नृसिंहवाडी, जयसिंगपूर, शिरढोण, कुरुंदवाड आणि दत्तवाड या महसुली क्षेत्रातील सर्कलचा दुष्काळ सदृश्य यादीमध्ये समावेश केला असून याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी पारित केला. दुष्काळ सदृश्य यादीमध्ये या महसुली क्षेत्रातील सर्कलचा समावेश झाल्यामुळे या सर्कल अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांमधील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ होणार आहे, जमीन महसुलामध्ये सूट, सहकारी कर्जांचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या वीज बिलात ३३.५ % सूट, शालेय विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजना अंतर्गत येणाऱ्या कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक असेल त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर, टंचाई असलेल्या गावातील शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे यासारख्या महत्त्वाच्या सवलती या योजनेअंतर्गत प्रत्येक गावातील शेतकरी व नागरिकांना मिळणार आहेत असे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी माहिती देताना सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा