संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. सचिन कांबळे यांना पीएचडी प्रदान

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे रसायनशास्त्र विषयाचे प्रा. सचिन कांबळे यांना शिवाजी विद्यापीठाची "सिंथेसिस अँड कॅराक्टरायझेशन ऑफ ट्रान्झिशन मेटल नॅनोपार्टीकल्स फॉर इट्स बायोलॉजीकल ऍप्लिकेशन्स" रसायनशास्त्र विषयामधे मानाची पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे.

त्यांना पीएचडीचे प्रमुख गाईड म्हणून डॉ. जे. एम. पाटील, को-गाईड डॉ. पी. डी. कांबळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर शिवाजी विद्यापीठाचे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. डी. सोनवणे, प्रा. डॉ. के. एम. गरडकर, डॉ. सागर डेळेकर, डॉ. पी. व्ही. अनभुले, डॉ. एस. एन. तायडे, नॅनोसायन्स विभागातील डॉ. के. डी. पवार, डॉ. डोंगळे यांचे साह्य लाभले. ओपन डिफेन्स व्हायवाचे चेअरमन डॉ. एस. एस. चव्हाण आणि रेफ्रि डॉ. भास्कर साठे यांनी संशोधन अहवालाचे परीक्षण केले. संशोधन कामकाजासाठी वेळोवेळी संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांचे अनमोल मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले आहे.

या संशोधनाबद्दल बोलताना प्रा. सचिन कांबळे म्हणाले ‘वनस्पतींच्या पानांचा अर्क वापरून व नॅनोटेक्नॉलॉजी चा वापर करून सिल्व्हर आणि गोल्ड नॅनोपार्टीकल्स तयार केले आहेत’. त्यांचा वापर विविध प्रकारच्या जंतूंना मारण्यासाठी केला आहे. तसेच शरीरात निर्माण होणाऱ्या डोपामाईनचे डिटेक्शन ही या नॅनोपार्टीकल्सचा वापर करून करण्यात आला आहे. या संशोधनाचा विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. माझ्या या यशामध्ये माझे कुटुंबीय सर्व सहकारी मित्रपरिवार यांचे सहकार्य लाभले आहे 


प्रा. सचिन कांबळे यांचा सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेला असून त्यांनी नियमित कष्ट, जिद्द आणि बुद्धीच्या जोरावर शिक्षणातील सर्वोच्च पदवी प्राप्त केली आहे. या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, विश्वस्त, विनायक भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष