पत्रकार रंगराव बन्ने यांच्या " आस तुझी रे लागली ' या अभंग संग्रहाचे २३ नोव्हेंबर रोजी होणार पंढरपुरात प्रकाशन

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

  निपाणी तालुक्यातील बारवाड येथील साहित्यिक व पत्रकार रंगराव बन्ने यांच्या " आस तुझी रे लागली " या अभंग संग्रहाचे गुरुवार दि.२३/११/२०२३ रोजी कार्तिकी एकादशी दिवशी पंढरपूर येथे प्रकाशन होणार आहे .

      रंगराव बन्ने हे १९८७ पासून साहित्य क्षेत्राबरोबरच १९९० पासून पत्रकार म्हणून सेवा करत आहेत.पत्रकारितेच्या माध्यमातून विविध विषयावर लिखाण करत आले आहेत.तर साहित्य क्षेत्रात आता पर्यंत २५० च्या वर कविता , २५० चारोळी,व ७५ विविध विषयावर कथा,धार्मिक,सामाजिक लेख लिहिले आहेत.तर त्यांचे तीन कथा संग्रह,दोन कविता संग्रह,एक पंढरीच्या वारीवर व धनगर समाजावर ,एक अशी सात पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

      या सात पुस्तकानंतर आता त्यांचा आस तुझी रे लागली हा अभंग संग्रह वाचकांच्या व वारकरी मंडळींच्या समोर येत असून या अभंग संग्रहात एकूण ७९ अभंग रचना आहेत.या अभंग संग्रहास आडी येथील हार्दायन श्री दत्त देवस्थान मठाचे प.पू.परमात्मराज महाराज यांचे आशीर्वचनपर मार्गदर्शन व कुन्नुर येथील ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार ह.भ.प.रामचंद्र कुळकर्णी महाराज यांची प्रस्तावना लाभली आहे.तर या अभंग संग्रहाचे प्रकाशक ताई प्रकाशन संस्था औरंगाबाद यांचेकडून छपाई करण्यात आली आहे.

       याच अभंग संग्रहाचे प्रकाशन २३ रोजी बारवाड येथील विठ्ठल रुक्मिणी वारकरी सांप्रदाय मंडळातर्फे काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्यात कुर्ली मठ सांगोला रोड पंढरपूर येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष