कुणबी नोंदीचे अभिलेख जबाबदारीने तपासा : आमदार यड्रावकरांच्या प्रशासनाला सूचना

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

 शिरोळ तालुक्याच्या महसूल, भूमी अभिलेख, पंचायत समितीसह सर्व विभागाकडून कुणबी नोंदी बाबतचे अभिलेख तपासण्याचे काम सुरू आहे पण अद्याप एकही कुणबी नोंद सापडली नाही, असे असले तरी मोडी व उर्दू लिपीत आढळलेल्या अभिलेखांची पडताळणी तातडीने करा व उर्वरित अभिलेख शोधताना कुणबी असल्याच्या नोंदी जबाबदारीने तपासा अशा सूचना माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुका प्रशासनाला दिल्या.

महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सकारात्मक पद्धतीने सुरू केलेल्या कार्यवाहीला आता गती आली आहे त्यामुळे मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यात आले असल्याचे सांगताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ज्या मराठा समाज बांधवांकडे व्यक्तिगत स्वरूपातील मराठी, उर्दू अथवा मोडी भाषेतील कुणबी नोंदी असल्याबाबतचे अभिलेख उपलब्ध असतील तर त्यांनी ते अभिलेख तातडीने तहसीलदार शिरोळ यांच्याकडे सादर करावेत, उर्दू व मोडी भाषा वाचू व लिहू शकणाऱ्या तज्ज्ञांची नेमणूक शासनाने असे अभिलेख शोधण्यासाठी केली आहे, अभिलेख उपलब्ध होणाऱ्या सर्व मराठा समाज बांधवांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाला कार्यवाही करणे सोयीचे होणार आहे त्यामुळे मराठा समाज बांधवांनी देखील या कामी तालुका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष