घोडावत विद्यापीठास उत्कृष्ट विद्यापीठासह पायाभूत सुविधा,ग्रीन कॅम्पस पुरस्कार

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

ऑडो॔र कॉम यांचेकडून संजय घोडावत विद्यापीठास उत्कृष्ट विद्यापीठासह पायाभूत सुविधा, ग्रीन कॅम्पस पुरस्कार प्राप्त झाला. हॉटेल रेडिसन ब्ल्यू पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात विश्वस्त विनायक भोसले यांनी ऑडो॔र कॉम चे सह-संस्थापक चंदन आनंद यांच्या हस्ते स्वीकारला.

      विद्यापीठाने विद्यार्थ्यांना उत्तम सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी उत्कृष्ट अशा प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग करून पडणाऱ्या पावसाची बचत विद्यापीठाने केली आहे.तसेच विद्यापीठाच्या आवारात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत.ज्यामध्ये काही परदेशी व देशी वाणांचा समावेश आहे. यामुळे विद्यापीठाचा परिसर हिरवागार झाला आहे. त्यामुळे येथील वातावरण एकदम प्रसन्न राहते. ज्याचा फायदा विद्यार्थ्यांना येथे शिक्षण घेताना होत आहे. 

    विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. ज्याचा लाभ विद्यार्थी घेत आहेत. उत्तम प्रशासन,उत्तम शिक्षण,सोयी- सुविधा आणि वातावरण यामुळे हा पुरस्कार विद्यापीठास देण्यात येत असल्याबद्दल संयोजकांनी सांगितले.

        या पुरस्काराबद्दल बोलताना विश्वस्त विनायक भोसले म्हणाले,की विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून पायाभूत सोयी सुविधा वातावरण व कोर्सेसची निर्मिती केली आहे. येथे कार्यरत असणाऱ्या सर्व प्राध्यापक,अधिकारी,कर्मचारी यांच्यामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.   या पुरस्काराबद्दल संस्थेचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी विद्यापीठासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष