राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विजय पाटील यांचा हेरवाड येथे सत्कार

 


हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्र राज्य महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार येथील शिक्षक विजय पाटील यांना सावंतवाडी येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हेरवाड येथील एकता युवा ग्रुप च्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना विजय पाटील म्हणाले, आजपर्यंत शैक्षणिक विभागात केलेल्या कामाची या पुरस्काराने पोहोचपावती मिळाली आहे. यापुढेही शैक्षणिक कार्यात अग्रभागी राहून कोणीही शिक्षणापासून वंचित राहणार नाही, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातल्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून या पुरस्कारामुळे पुढील कार्य करण्यासाठी बळ मिळाले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी राजू ढोणे, माजी उपसरपंच विकास माळी, श्रीकांत ईटाज, श्रेणीक ढोणे, हरिष कुन्नुरे, संतोष शिरोळे, राहूल ईटाज यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष