श्री १००८ मुनिसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिर व विर सेवा दल मलिकवाड यांच्या वतीने विविध स्पर्धांचे आयोजन
प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :
निरागस बालपण जपत संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी एक छोटासा प्रयत्न व बालकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन सोबतच पालकांसाठी सुंदर मार्गदर्शन आगमन व आश्रिवचन प पु जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींचे आशिर्वाचन होणार आहे,व संस्कार क्षम पिढी घडविण्याकरिता आई वडिलांची भूमिका व कर्तव्य व जागृतीचे विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे.
१९ नोव्हेंबर सकाळी दहा वाजता लहान बाळांच्या रांगन्याच्या स्पर्धा,१०० मिटर धावण्याच्या स्पर्धा, बुद्धीबळ स्पर्धा,व स्मरणशक्ती स्पर्धा होणार असुन पहिला, दुसरा व तिसर्या क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिके व बक्षीस देण्यात येणार आहे.
रांगण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी बाळ एक वर्षाच्या आत आसावे,१०० मिटर धावण्याच्या स्पर्धेत सहभाग होण्यासाठी वय ५ वर्षाच्या आतिल मुले मुली सहभागी होऊ शकतात, बुध्दीबळ स्पर्धेसाठी वय १० वर्षाच्या आतिल मुले मुली सहभागी होऊ शकतात,व स्मरणशक्ती स्पर्धेत इयत्ता ५ वी च्या मुला-मुलींना सहभागी होता येईल,या साठी वेळेचे बंधन नाही,या स्पर्धेसाठी जन्म तारखेचा दाखला द्यावा लागेल, अधिक माहितीसाठी संपर्क श्री विजय चिंचवाडे मो, नंबर ९९०११३७६२७, व श्री रावसाहेब कुन्नुरे मलिकवाड ९४४८८२७९७६ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा