माळी व श्री ओंकार माळी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी

 


अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :

सदलगा शहरातील उद्योजक श्री कृष्णात माळी व श्री ओंकार माळी यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी आणि सदलगा शहरातील नगरपालिकेच्या सफाई कामगारांना व पत्रकारांना दिली दिपवाळीची अनोखी अनेक साहित्यांच्या वस्तूंची सदिच्छा भेट.

सदलगा शहरातील सुपर बजार व बेडकिहाळ येथील कृष्णा ज्वेलर्स चे मालक श्री माळी बंधू यांनी शहरातील स्वच्छतेच्या कामात नेहमी अग्रेसर असणारे व सुंदर शहर ठेवण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे सदलगा नगरपालिका सदलगा येथील सर्व सफाई कर्मचारी ,नगरपालिकेतील इतर कर्मचारी आणि समाज मनाचा आरसा असणारे पत्रकार या सर्वांच्या संवेदनशील कार्याची दखल घेऊन या सर्वांची दिवाळी आनंदात जावी या उदात्त हेतूने आणि चांगल्या उद्देशाने यावर्षीच्या दीपावली सणानिमित्त सुपर बाजार सदलगा यांच्यावतीने वरील सर्व समाज सेवकांना सप्रेम भेट वस्तूची अनोखी किट भेट म्हणून देण्यात आले. 

सदर भेट वितरण प्रसंगी सदलगा नगरपालिकेत सुपर बाजार चे संस्थापक श्री कृष्णात माळी, श्री ओंकार माळी, सदलगा गाव कामगार पाटील श्री प्रणिल पाटील, सदलगा शहरातील जेष्ठ पत्रकार श्री अण्णासाहेब कदम, निवृत्त शिक्षक श्री डेक्कनवर सर ,युवा सामाजिक कार्यकर्ते भूषण खोत या सर्वांच्या उपस्थितीत भेट वस्तूचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी सदलगा नगरपालिकेचे सर्व सफाई कामगार, कर्मचारी वर्ग, अधिकारी वर्ग ,पत्रकार मित्र बंधू उपस्थित होते. यावेळी श्री माळी बंधू यांनी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या. आणि पुढील सामाजिक कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.



 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष