दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे मिळणाऱ्या सवलती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा

आढावा बैठकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रशासनाला सूचना

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील सातही महसुली मंडळ महाराष्ट्र शासनाकडून दुष्काळ सदृश्य परिस्थिती म्हणून घोषित करण्यात आली आहेत त्यामुळे जवळपास सर्वच शिरोळ तालुक्याला दुष्काळ सदृश्य परिस्थिती मुळे शासनाने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत आहेत या सर्व सवलतींचा लाभ तालुक्यातील सामान्य जनता व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा असे आदेश माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले,

शिरोळ तालुका दुष्काळ सदृश्य घोषित झाला असल्यामुळे शिरोळ तहसीलदार कार्यालयात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तालुक्यातील सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक सोमवारी घेतली यावेळी ते बोलत होते तहसीलदार अनिलकुमार हेळकर प्रमुख उपस्थित होते.

यावर्षी ज्या महसुली मंडळामध्ये सरासरी पावसापेक्षा ७५% कमी म्हणजे ७५० मिलिमीटर पेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे असे सर्व महसूल विभाग शासनाने दुष्काळ सदृश्य जाहीर केले आहेत, शिरोळ तालुक्यातील सातही महसुली सर्कलमध्ये सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला असल्यामुळे आपल्या तालुक्याला शासनाच्या सवलतीचे लाभ मिळणार आहेत असे सांगताना दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी व नागरिकांना शासन सवलतीचे लाभ प्राधान्याने द्या असे आदेश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले,

शासन निर्णयामुळे शेतकऱ्यांना चालू वीज बिलात ३३.५% सवलत मिळणार आहे, थकबाकी पोटी वीज मंडळाकडून शेतकऱ्याची यावर्षी वीज तोडणी करू नये, थकीत बिला बाबत वीज मंडळाने शेतकऱ्यांना हप्ते बांधून द्यावेत अशा स्पष्ट सूचना आमदार यड्रावकर यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या, शेती महसूल माफ, शासन निर्णयाप्रमाणे सहकारी व राष्ट्रीयकृत बँकाकडील शेतीसाठीच्या कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश यावेळी आमदार यड्रावकर यांनी सहकार निबंधकांना दिले, १०१ ची प्रकरणे देखील थांबवण्याच्या सूचना दिल्या शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ होणार आहे, टंचाईग्रस्त गावांमध्ये आवश्यक तिथे पिण्याचे पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्यावेत, रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या कामांमध्ये अटीमध्ये शिथिलता असे विविध लाभ आणि सवलती राज्य शासनाकडून जाहीर झाल्या आहेत या सर्व सवलतींची अंमलबजावणी प्रभावीपणे करा असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बैठकीत शेवटी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले, गटविकास अधिकारी शंकर कवितके, महावितरणचे श्री. गोंदील, पाटबंधारे विभागाचे रोहित दानोळे, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता तुषार शिरगुप्पे कुरुंदवाड नगरपरिषदेचे प्रशासक आशिष चव्हाण, शिरोळ नगरपरिषदेचे प्रशासक निशिकांत प्रचंडराव, जयसिंगपूर नगरपरिषदेच्या प्रशासक श्रीमती टीना गवळी, सहकार निबंधक अनिल नादरे, भूमी अभिलेख अधिकारी श्रीमती माळवदे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता संदेश बदडे, कुरुंदवाड आगाराचे प्रमुख नामदेव पतंगे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष