केंद्रीय जल आयोगचे रवींद्र पिसाळ यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार
अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :
चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या केंद्रीय जल आयोग दिल्ली अंतर्गत या कार्यालयातील कर्मचारी श्रीयुत रवींद्र वसंतराव पिसाळ हे नुकतेच आपल्या कार्यालयीन कामकाजातून नुकतेच निवृत्त झाले.
त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम काल त्यांच्या सर्व मित्रांनी व चाहत्यांनी व त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घरगुती पद्धतीने साजरा करण्यात आला. आपल्या सेवेमध्ये त्यांनी प्रसार माध्यमांना पूरग्रस्त भागातील पावसाळ्यातील नद्यांच्या पाण्याची पातळी, नदीतील पाण्याची उंची ,संबंधित धरण क्षेत्रातील पाण्याचा साठा , पाण्याचा विसर्ग,याविषयी सविस्तर माहिती वेळोवेळी प्रसार माध्यमांना तत्परतेने देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली व प्रसारमाध्यमाशी त्यांनी सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले होते. या जनप्रिय कर्मचाऱ्यांच्या सत्कारा प्रसंगी प्रारंभी सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन चे कार्यवाह श्रीयुत अण्णासाहेब कदम यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांचे परम स्नेही इंजीनियरिंग कॉलेजचे प्राध्यापक श्रीयुत प्रकाश शंकर देसाई सर यांनी त्यांच्या कार्य तत्परतेचा व कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला आणि त्यांना पुढील आयुष्य आनंदाचे जावो अशा शुभेच्छा दिल्या.सदलगा शहरातील पत्रकार श्री अनंत दीक्षित सेवानिवृत्त स्वातंत्र्यसैनिक श्री अण्णासाहेब खेबुडे, सामाजिक कार्यकर्ते श्री कल्लाप्पा हुनशाळे श्री सुरेश बडगेर, आणि शहरातील इतर मान्यवर या
सर्व सहकाऱ्यांनी या सदिच्छा निवृत्ती समारंभ कार्यक्रमाप्रसंगी त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या व त्यांनी केलेल्या चांगल्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी शहरातील नागरिक त्यांचे मित्र परिवार, कुटुंबीय मंडळी व कार्यालयातील मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा