बोरगावची श्री सिध्देश्वर को ऑप क्रेडिट सोसायटी "उत्तम सहकारी संघ" म्हणून सन्मानित

 अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

           बोरगांव येथील श्री सिध्देश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीस कर्नाटक राज्य सहकार क्षेत्राच्या पुढाकाराने व कर्नाटक राज्य को ऑप फेडरेशन,कर्नाटक राज्य सहकार महामंडळ,कर्नाटक राज्य सौहार्द सहकार महामंडळ, कर्नाटक राज्य सरकार तोटगारिका महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा "उत्तम सहकार संघ" हा मानाचा पुरस्कार देवून धारवाड जिल्ह्यातील कलघटगी येथे शुक्रवार दि 17 रोजी आयोजित 70 व्या अखिल भारतीय सप्ताहात राज्य कामगार व धारवाड पालक मंत्री संतोष लाड यांच्या अध्यक्षतेखाली व नामांकित मंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थापक चेअरमन आण्णासाहेब हवले,प्रधान व्यवस्थापक संजय हवले यांच्यासह संचालक मंडळास मान व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.राज्य सरकारकडून देण्यात येणारा हा पुरस्कार श्री सिध्देश्वर पतसंस्थेला मिळाल्याने संस्था व संस्था चालकांचे सर्वत्र अभिनंदन केले होत आहे .

संस्थापक चेअरमन आण्णासाहेब हवले यांनी बोरगाव सह पंचक्रोशीतील शेतकरी सभासद व गरजू लोकांना सहकार,कृषी,शैक्षणिक,व्यवसायिक व समाजभिमुख क्षेत्रात आर्थिक सहकार्य करण्याच्या उद्देशाने बोरगाव सारख्या ग्रामीण भागात सन 1999 साली श्री सिध्देश्वर को ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना केली.संस्था हि केवळ ठेवीदारांच्या सुरक्षितेसाठीच न उभिकरता ठेवीदारांबरोबर भागातील सर्वांना एक विश्वसनीय संस्था लाभावी त्याचबरोबर तळागाळातील सर्वसामान्य जनतेचा किंबहुना शेतकरी वर्गाचा आर्थिक सहकार्याचा भार सांभाळता यावा,पत हिन माणसाचीहि पत सुधारून त्यास आर्थिक सहाय्यता करून त्यांची उन्नती करावी या उद्देशाने ग्रामीण भागामध्ये या संस्थेचा उगम झाला आहे.त्यांनी सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रालाही प्राधान्य देत त्याच्या माध्यमातून अनेक वंचित गोरगरीब कुटुंबांना न्याय दिला आहे.महापूर,कोरोना अशा परिस्थितीतही लोकांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांना जीवनावश्यक वस्तूही पुरवठा केल्या आहेत.

बेळगाव जिल्हासह निपाणी तालुक्यातही सहकार क्षेत्र वाढावे यासाठी त्यांनी जवळपास 14 शाखेत विस्तारीकरण केले आहे.तर मुख्य शाखेची टोलेजंग सुसज्ज इमारत उभा करण्याचेही कार्य जोमाने चालवले आहे. शिवाय सभासदांना संस्था स्थापने पासून आजतागायत सर्वाधिक 16 लाभांश देत, सभासदांच्या मुलांना शैक्षणिक, व्यवसायिक क्षेत्रात हि आर्थिक सहकार्य करण्यास संस्थेचा नेहमी पुढाकार आहे..पार्श्वभूमीवर संस्था व संस्थाचालकांचा पारदर्शी कारभार,सभासदांचा प्रामाणिक व्यवहार व कर्मचाऱ्यांचे निस्वार्थी कार्य यामुळे संस्थेने अल्पावधीत सहकार क्षेत्रात प्रगती साधली आहे.तर संस्थेने शहराबरोबर तालुका,जिल्हास्तरावरही स्वच्छ व पारदर्शकतेचा झेंडा अटकेपार नेल्याने संस्थेने लोकप्रियता मिळवत आज संस्थेची राज्य पातळीवरील कर्नाटक राज्य सहकारी महामंडळाने दखल घेऊन या संस्थेला राज्यातील एक उत्कृष्ट "उत्तम सहकारी संघ " या पुरस्कारचा मानकरी बनविले आहे.

याप्रसंगी महामंडळाचे डॉ संजय व्हसमठ,सुकुमार चिप्रे,भाऊसाहेब पाटील,विद्याधर अम्मानवर,शिवाप्पा माळगे,अण्णासाहेब बारवाडे,बाबासाहेब पाटील,सुरेंद्र पाटील,आण्णासाहेब मालगावे,रामचंद्र फिरगनावर, बाळाराम खोत,सुभाष गोरवाडे, संजय बंकापुरे,रशीद मोमीन,स्मिता माळी,पद्मश्री बंकापुरे,बाबासाहेब बंकापुरे, विजयकुमार शिंगे,संजय हवले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष