कारदगा येथे दि.२६ रोजी २६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक दि.बा.पाटील.

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

  कारदगा तालुका निपाणी येथील साहित्य विकास मंडळ कारदगा यांच्यावतीने रविवार दि २६ नोव्हेंबर रोजी २६ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होत असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी कामेरी जिल्हा सांगलीचे जेष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील हे असून सकाळी ८ ते रात्री ९ यावेळेत एकूण चार सत्रात कै. सत्याप्पा माळी व्यासपीठ डी.एस.नाडगे कॉलेज पटांगण येथे हे संमेलन होणार असल्याची माहिती साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद यांनी दिली.

   ते कारदगा येथील डीएस नाडगे हायस्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. प्रारंभी विनोद परीट यांनी स्वागत, तर माजी अध्यक्ष बाळासो नाडगे यांनी प्रास्ताविक केले.तर उपस्थितांची ओळख उपाध्यक्षा सुनीता कोगले यांनी कले

   यावेळी बोलताना काशीद पुढे म्हणाले रविवारी होणाऱ्या या साहित्य संमेलनामध्ये सकाळी ८ ते १० यावेळेत ग्रंथदिंडी, तर सत्र पहिल्या मध्ये सकाळी १०: ३० ते १ या वेळेत पुणे येथील आयकर आयुक्त अभिनय कुंभार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार असून जवाहर साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन, दत्त साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते व्यासपीठ उद्घाटन,तर कारदगा ग्रामपंचायत सुजाता पांडुरंग वडर या स्वागत अध्यक्षा असणार आहेत. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या खेळ हा जीवनाचा या पुस्तकाचा अर्पण सोहळा होणार आहे.

  दुपारी १ ते ५ या वेळेत दुसऱ्या सत्रात कोल्हापूर राजाराम महाविद्यालय मराठी विभागप्रमुख डॉ. रघुनाथ कडाकणे यांच्या तंत्रयुगात भाषा व साहित्याचे महत्त्व या विषयावर व्याख्यान,तर मुलाखत कार्यक्रमांमध्ये पुणे ग्रामीण कथाकार सुचिता घोरपडे,यांची प्रा. नानासाहेब जामदार, डॉ. रमेश साळुंखे हे मुलाखत घेणार आहेत.यानंतर नागठाणेचे कथाकथनकार हिम्मत पाटील यांचे कथाकथन, व निपाणी तालुका व कारदगा परिसरातील निवडक नवोदित कवी वृषाली कापसे, रुकसाना मुल्ला, कुमुदिनी मधाळे, संचित कांबळे, दादासो जनवाडे, संतोष माने, वैशाली पाटील, कुसुम बोते, सरिता मिरजे,आप्पासाहेब पोवार, गजानन पाटील, कुमार हेगडे, या कवींचे कवी संमेलन, सायंकाळी ५ ते ७ या तिसऱ्या सत्रात आबा पाटील मंगसुळी, रोहित शिंगे इंचलकरंजी, विश्वास पाटील राधानगरी, या कवींचा काव्य बहर कवी संमेलन, सायंकाळी ७ ते ९ यावेळेत चौथ्या सत्रात प्रा. कपिल पिसे,संदीप काळे,अमृता होगाडे, मयुरी गोंधळी यांच्या आम्ही कलाकार सांस्कृतिक प्रतिष्ठान इंचलकरंजी प्रस्तुत ठेविले अनंत तैशीचे,व एग एग सरी ,या एकांकिका कार्यक्रम होणार आहे.

  या साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमास चिकोडी लोकसभा खासदार अण्णासाहेब ज्वोल्ले, आमदार प्रकाश हुक्केरी, आमदार शशिकला ज्वोल्ले,आमदार गणेश हुक्केरी,माजी मंत्री वीरकुमार पाटील,माजी आमदार काकासाहेब पाटील,माजी आमदार सुभाष जोशी,अरिहंत सौहार्दचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब पाटील,पी.एल.डी. बँक संचालक लक्ष्मणराव चिंगळे, साई उद्योग समूहाचे शिल्पकार प्रदीप जाधव,सिद्धेश्वर सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब हवले, सहकार रत्न श्री उत्तम पाटील, कारदगा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अभिनंदन मुराबट्टे, जंगली महाराज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अरविंद खराडे,ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

 शिवाय साहित्य विकास मंडळ व पतंजली योग समिती कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार ता.१७ ते २३ अखेर रोज पहाटे ५:३० ते ६:३० यावेळेत योगशिक्षक बाळासाहेब नाडगे, यशवंत वडगावे यांचे योग प्राणायाम शिबिर होणार असल्याची माहिती दिली.

  या पत्रकार बैठकीस महादेव दिंडे ,सुभाष ठकाने,भाऊसाहेब शिंदके महावीर पाटील,कल्पना रायजाधव,सदाशिव पारगावे, कुमार हेगडे, संजय नवनाळे, शिवाजी माने,तुकाराम घुणके, प्रशांत खराडे, रावसाहेब वीसावंत, यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष