आज पालखी मिरवणूकीने श्री संतुबाई देवीच्या यात्रेला होणार प्रारंभ

 जंगी कुस्त्या, किर्तन, व्याख्यानासह होणार विविध कार्यक्रम

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 हेरवाड येथील ग्रामदैवत श्री संतुबाई देवीच्या यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक, भव्य जंगी कुस्त्या, किर्तन, शर्यती यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे ही यात्रा १४ ते २० नोव्हेंबर अखेर मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी होत आहे. आज सायंकाळी ६ वाजता पालखी मिरवणूकीने पालखी मिरवणूकीने श्री संतुबाई देवीच्या यात्रेला प्रारंभ होणार आहे.

यात्रेनिनिमित्त मंगळवार दि. १४ रोजी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी धनगरी लोककला नृत्य व शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात येणार आहे. यावेळी खासदारधैर्यशील माने, खासदार धनंजय महाडीक, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, आदी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी रात्री १० वाजता भव्य धनगरी ढोलवादन स्पर्धा संपन्न होणार आहेत.

बुधवार दि.१५ रोजी सकाळी १० वाजता भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता श्वान पळविण्याच्या स्पर्धा संपन्न होणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ४ वाजता गुरुवर्य हभप देवव्रत उर्फ राणोजी विवेकानंद वासकर यांचे प्रवचन तर हभप भानुदास तळेकर गुरुजी यांचे किर्तन संपन्न होणार आहे. याच दिवशी ८ वाजता ग्रामपंचायत पटांगण येथे भव्य कवी संमेलन संपन्न होणार आहे. रात्री ९ वाजता भव्य धनगरी कन्नड गायनाचा सवाल-जवाब कार्यक्रम संपन्न होणार आहे.

गुरुवार दि. १६ रोजी सकाळी १० वाजता बैलगाडी, घोडागाडी व घोडा व बैल शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून गटनेते व गांवकामगार पाटील दिलीप उर्फ मफत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच माजी आमदार उल्हास पाटील व पृथ्वीराज यादव यांच्या हस्ते शर्यतीचे उद्घाटन करण्यातयेणार आहे. याच दिवशी दुपारी १२ वाजता महाप्रसादाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. याच दिवशी दुपारी ३ वाजता भव्य जंगी कुस्त्यांचे मैदान संपन्न होणार असून पै. श्रीमंत भोसले व पै.शांताराम शिंदे यांच्यात प्रमुख लढत होणार असून इतर ५० हून अधिक चटकदार कुस्त्या संपन्न होणार आहेत. या कुस्ती मैदानाचे उद्घाटन आमदा राजेंद्र पाटील यड्रावकर, अनिल यादव, गटनेते वसंतराव देसाई, गटनेते दिलीप उर्फ मफत पाटील, सरपंच रेखा जाधव, उपसरपंच हयाचाँद जमादार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच दिवशी रात्री १० वाजता वैभव ऑर्केस्ट्राचा शानदार मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. १७ रोजी दुपारी ३ वाजता रेडकू पळविणे स्पर्धा, म्हैस पळविणे स्पर्धा संपन्न होणार आहेत. याच दिवशी रात्री ९ वाजता भव्य जनरल धनगरी ओव्यांचा कार्यक्रम व बक्षिस समारंभ संपन्न होणार आहेत. याच दिवशी रात्री ८ वाजता भव्य मल्लखांब प्रात्यक्षिके व महिला कुस्ती दंगल होणार आहे. शनिवार दि. १८ रोजी दुपारी ३ वाजता डंपिंग ट्रॅक्टर रिव्हर्स स्पर्धा, हातात बैल धरुन पळविण्याच्या स्पर्धा, सायंकाळी ७ वाजता दांडिया स्पर्धा होणार आहेत. १९ रोजी भव्य हलगीवादन स्पर्धा तर दि. २० रोजी वसंतराव हंकारे यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष