सदलगा शहरातील सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा
अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :
चिकोडी तालुक्यातील सदलगा शहरातील सदलगा नगरपालिका सदलगा या संस्थेचे कर्मचारी श्री प्रकाश माळगे हे सफाई कामगार आहेत त्यांची आर्थिक स्थिती देखील बेताचीच आहे. काल संध्याकाळी नवीन बसस्थानक शेजारी सफाई चे काम करताना त्यांना एक पर्स मिळाली. त्यांनी ती पर्स प्रामाणिकपणे कर्तव्यदक्ष राहून आपले वरिष्ठ मुख्याधिकारी श्री शिवानंद भोसले यांच्याकडे दिली. त्यांनी त्या पर्समधील ओळखीवरून तन्मय कुलकर्णी या व्यक्तींना बोलावून सदर पर्सची खातर जमा केली. पर्स त्यांचीच असल्याची ओळख पटल्यानंतर सदर पर्स मूळ मालकाच्या स्वाधीन करण्यात आली. याप्रसंगी मुख्याधिकारी यांनी आपल्या सफाई कामगाराचे प्रामाणिकपणाचे कौतुक करून त्याचा नगरपालिकेच्या वतीने गौरव केला. याप्रसंगी नगरपालिकेचे कर्मचारी संजीव गुढे, विजय कोकणे, कृष्णा बागडी, महंमद अली गवंडी, कुमार स्वामी, प्रकाश मोगली, आय बी सेशम, पी बी गर्दाळ, एल व्ही मधाळे, जी एस कांडेकर ,रुपेश करंगळे, विजय पाटील मोहन राजापुरे.इत्यादी कर्मचाऱ्यांसोबत अनेक नागरिक उपस्थित होते. समाजामध्ये प्रामाणिकपणा दुर्मिळ होत चाललेला असताना, समाजातील सफाई कामगारांच्या जवळ असलेला हा मोठ्या मनाचा प्रामाणिकपणा आज सदलगा शहराला एक आदर्श निर्माण करून देत आहे. त्याबद्दल संपूर्ण शहरवासीयांच्या वतीने सफाई कामगार श्री प्रकाश माळगे यांना प्रामाणिकपणाचा सलाम.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा