सदलगा शहरातील बाल क्रांती मंडळांने साकारली छत्रपती शिवरायांची राजधानी रायगड किल्ले प्रतिकृती
बालकलाकारांच्या किल्ल्याचे आर के फाउंडेशन च्या वतीने केले कौतुक व प्रोत्साहन पर केले शालेय साहित्याचे वाटप
अण्णासाहेब कदम / शिवार न्यूज नेटवर्क :
चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरातील बाल क्रांती मंडळांने यावर्षी दीपावलीच्या निमित्ताने छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडची प्रतिकृती अत्यंत आकर्षक व सर्व बाबींची सूक्ष्म नोंदी घेऊन जिवंत साकारली होती. या किल्ला सजावटीला सदलगा शहरातील आर के फाउंडेशनने सदिच्छा भेट देऊन, त्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, बाल मनामध्ये इतिहासाची आवड निर्माण व्हावी, बाल मनातील छंदातून थोर पुरुषांच्या इतिहासाची ओळख त्यांना व्हावी व त्याचा समाजाला उपयोग व्हावा या उदात्त हेतूने किल्ला सजावटीत सहभागी झालेल्या सर्व बालकलाकारांना त्यांच्या केलेल्या कर्तुत्वाची पोहच पावती म्हणून आपल्या शैक्षणिक जीवनात उपयोगी पडणारे शालेय साहित्याची भेट आर के फाउंडेशनचे कार्यवाह श्री अण्णासाहेब कदम, शहरातील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते श्री मोहनरावजी शितोळे, सदलगा पूर्व भाग पि के पी एस चे संचालक बंडा तपकिरे, शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री कुमार माने, श्री रमेश माने, युवराज माने, यांच्या हस्ते बाल चमुना प्रदान करण्यात आले.
या किल्ला प्रतिकृती सजावटीमध्ये कु. आदित्य माने, कु.विजय पोतदार, कु.आदर्श माने कु.सर्वेश पोतदार ,कु.सोहम उपाध्ये व कु.समर्थ तवणक्के या बाल कलाकारांनी सहभाग घेतला. या सर्वांचे उपस्थित मंडळींनी कौतुक केले. आणि
विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, इतिहासाची जाणीव जागृती निर्माण व्हावी या हेतूने सदलगा शहरातील सेवाभावी संस्था आर के फाउंडेशन व कुमार माने पुरस्कृत पुढील दीपावली सणानिमित्त किल्ला सजावटीसाठी कोणती अट न ठेवता सर्वांना आपल्या मनाला आवडेल तो किल्ला सादर करून त्या सर्वांना स्मृतीचिन्ह व शालेय साहित्याचे वाटप करणार असल्याचे संबंधित आयोजकांनी यावेळी जाहीर केले. या जाहीर केलेल्या किल्ला सजावटीच्या कार्यक्रमाला बाल मंडळींनी जोशात स्वागत केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा