शिरोळ नगरपालिकेच्या सभेत विविध विकास कामाबरोबरच सर्व विषयाना मंजुरी
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ शहरातील भुयारी गटार योजनेकरिता पंपिंग स्टेशन कामी अंदाजे 67 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून यासाठी खाजगी मालकीची जागा खरेदी करणे, महाराष्ट्र गुंठेवारी अधिनियम 2001 च्या शासन सुधारित निर्णयानुसार ३१ डिसेंबर अखेर मुदतवाढ घेणे यासह सर्व विषयांना नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली .
दरम्यान,या सभेत विविध कामांच्या मंजुरीनंतर ५ वर्षे यशस्वी कार्यकाल केलेबद्दल नगरपालिकेच्या विद्यमान लोकप्रतिनिधीना नगरपालिका प्रतिमा भेट देऊन सन्मान करण्यात आला .
येथील दिनबंधु दिनकररावजी यादव सभागृहात आयोजित केलेल्या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते . नगरपालीका कार्यालयीन निरिक्षक संदिप चुडमुंगे यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले . यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी प्रशासनास चांगले सहकार्य केलेबद्दल नगराध्यक्ष पाटील यांच्यासह नगरसेवक ,नगरसेविका यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली. नगरपालिकेची पंचवार्षिक कार्यकाळातील अखेरची सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
या सभेत नगरपालिकेच्या काही नगरसेवक व नगरसेविका यांनी पाच वर्षाच्या काळात मतभेद अथवा विरोधी ठराव झालेला नाही याबद्दल कौतुक करून नगरपरिषदेच्या कर्मचारी, अधिकारी यासह जनतेचेही चांगले सहकार्य मिळाल्याचे भाषणात सांगितले. नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी शाहू विकास आघाडीच्या नेत्यांबरोबरच नगरसेवक पदाधिकारी , प्रशासन तसेच जनतेचे आभार मानले.
या सभेस उपनगराध्यक्ष करुणा कांबळे , नगरसेवक प्रकाश गावडे, श्रीवर्धन माने - देशमुख , योगेश पुजारी , तातोबा पाटील , इम्रान अत्तार , राजेंद्र माने , दयानंद जाधव , दादासो कोळी यांच्यासह नगरसेविका कमलाबाई शिंदे , जयश्री धर्मादिकारी , कुमुदिनी कांबळे , सुनिता आरगे , सुरेखा पुजारी , विदृला यादव , अनिता संकपाळ , कविता भोसले तसेच न पा कर्मचारी, अधिकारी आदि उपास्थितीत होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा