28 देशातून घेण्यात येणाऱ्या अबॅकस स्पर्धेत कुरुंदवाडची कन्या स्वरा बाबर हिने पटकावला दुसरा क्रमांक


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

दि. 28/12/2023 रोजी मुंबई येथे पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन संपन्न झाली या स्पर्धेमध्ये कुरुंदवाड मधील कुमार विद्या मंदिर नं ३ या शाळेतील कु स्वरा निलेश बाबर या विदार्थीनीने दुसरा क्रमांक मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्वल केले आहे. पामा ग्लोबल इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धा भारतात प्रथमच घेण्यात आली आहे. या स्पर्धेत एकुण 28 देशांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत कुरुंदवाडची कन्या स्वरा बाबर हिने दुसरा क्रमांक पटकावला आहे.तिच्या या यशाबद्दल कुरुंदवाड सह परिसरातून कौतुक होत आहे. या यशात शाळेचे मुख्याध्यापक रवी कुमार पाटील सर इतर शिक्षक व अबँकस टिचर राधिका चव्हाण मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले.व तीच्या पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष