लिफ्ट कामास प्रारंभ झालेबदल प्रहार दिव्यांग संघटने तर्फे गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार
शिरोळ पंचायत समिती इमारतीमध्ये ७ वर्षानंतर दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मिळणार लिफ्टची सुविधा
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांच्या प्रयत्नामुळे प्रशासकीय इमारतीमधील लिफ्टच्या कामाला ७ वर्षांनंतर कामास सुरुवात झाली . याकामी पाठपुरावा केल्याबददल प्रशासक तथा गटविकास अधिकारी शंकर कवितके यांचा ' प्रहार ' संघटने तर्फे सत्कार करण्यात आला.
येथील पंचायत समिती कार्यालय येथे प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे आयोजित सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ दगडू माने होते. यावेळी कवितके यांना सन्मानपत्र कोल्हापुरी फेटा व शाल देऊन प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष सईद पिरजादे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच पंचायत समितीचे बांधकाम उपाभियंता संदेश बदडे यांचा कुरुंदवाड शहराध्यक्ष सुधाकर तावदारे यांनी सत्कार केला. प्रहारचे राजेंद्र प्रधान यांनी स्वागत केले. प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष पिरजादे यांनी प्रास्ताविक भाषणात पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांसह गटविकास अधिकारी कवितके यांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समितीचे बांधकाम उपअभियंता संदेश बदाडे , दिव्यांग सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल राजू उर्फ अनिल देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
गटविकास अधिकारी कवितके म्हणाले, दिव्यांग व अन्य पक्षकारांची कामे वेळेत व्हावीत यासाठी आपला प्रयत्न राहील. विशेषतः दिव्यांगांची गैरसोय दूर करण्यासाठी सुमारे २० लाख रुपयांचे लिफ्टसाठी टेंडर निविदा होवून प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होऊन लिफ्ट सेवेचा लाभ मिळणार असून कोणत्याही शासकीय कामासाठी थेट भेटावे असेही त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सहाय्यक गटविकास अधिकारी प्रदीप पाटील ,विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे , सुधाकर तावदारे , नारायण लोखंडे , सुनीता पाटील ,गणेश पवार ,योगेश माने , राजेंद्र प्रधान, प्रदीप आयगोळे ,यमनाप्पा पाथरवट , अनिल पात्रवट ,कलंदर मकानदार सादिक बागवान समीर नदाफ महिला तालुकाध्यक्ष सुनीता पाटील राजश्री गवळी दिपाली मुंगळे , बंडा परीट अनिता कुरणे आदी उपस्थित होते. बंडा परीट यांनी आभार मानले.
दरम्यान, अंत्योदय रेशन कार्ड मिळावे या मागणी चे निवेरन प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना देण्यात आले. निवेदनामध्ये पंधरा दिवसांमध्ये काहीतरी निर्णय झाला पाहिजे असे सांगण्यात आले. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास शिरोळ तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा