केंद्रस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत राजाराम विद्यालयाचे घवघवीत यश

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

     येथील राजाराम विद्यालय क्रमांक २ या शाळेने धरणगुत्ती येथे झालेल्या सांस्कृतिक व अर्जुनवाड येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

     राजाराम विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी धरणगुत्ती येथे झालेल्या केंद्रस्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत मोठा गटातील नाट्यीकरण स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला. अर्जुनवाड येथे झालेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजाराम विद्यालयातील विद्यार्थी स्वराज्य संदीप धनगर याने कुस्ती कुस्ती स्पर्धेत 30 किलो वजनी गटात द्वितीय क्रमांक तर आराध्या सर्जेराव कांबळे, हिने कुस्ती 35 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मनोजकुमार रामफुल प्रजापत , याने मोठा गट थाळीफेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक रोहित राहुल पोवार, 50 मीटर धावणे,100 मीटर धावणे याने द्वितीय क्रमांक आदिती सर्जेराव कांबळे, हिने २०० मीटर धावणे स्पर्धेत तृतीय क्रमांक श्रावणी सर्जेराव कांबळे हिने उंच उडी द्वितीय क्रमांक मिळवून शाळेचे नाव लौकिक केले.

   या सर्व सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका  सौ.नीता चव्हाण शिक्षक श्रीमती सुनंदा पाटील सौ त्रिशला येळगुडे मीनाक्षी हेगाना सनी सुतार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्जेराव कांबळे उपाध्यक्ष शितल जगदाळे यांच्यासह सर्व सदस्य पालक यांचे प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष