जयसिंगपूर व नृसिंहवाडी बस स्थानकासाठी ४ कोटी ८७ लाखाचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

 नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सांगता होत असताना शिरोळ विधानसभा मतदारसंघातील जयसिंगपूर शहरातील बसस्थानकासाठी काँक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी हिंदुऱ्हूदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत २ कोटी २२ लाखाचा निधी मंजूर झाला असून तालुक्यातील तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी बस स्थानकासाठी याच योजनेअंतर्गत २ कोटी ६५ लाख इतका निधी मंजूर झाला असल्याची माहिती माजी आरोग्य राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे, मोठ्या प्रमाणात मिळालेल्या या निधीमुळे तालुक्यातील या दोन्ही महत्त्वाच्या बस स्थानकाचे रूप पालटणार असून प्रवाशांना चांगल्या सेवा उपलब्ध होणार आहेत, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ व राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून ही कामे केली जाणार असून यापूर्वी जयसिंगपूर बस स्थानकासाठी मंजूर २ कोटी रुपयाच्या कामाची निविदा प्रसिद्ध झाली असून या निधीमधून ५ नवीन प्लॅटफॉर्म व १२ दुकान गाळे उभारण्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निवेदनात म्हटले आहे, सांगली कोल्हापूर रोडवरील महत्त्वाच्या अशा जयसिंगपूर शहरासाठी व तालुक्यातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र नृसिंहवाडी बस स्थानकासाठी हा निधी मंजूर झाला असल्यामुळे ही दोन्ही बस स्थानके उत्तम दर्जाची होणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेवटी म्हटले आहे, हा निधी मंजूर करण्यास संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सहकार्य केले असल्यामुळे या सर्वांचे आमदार यड्रावकर यांनी आभार व्यक्त केले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष