पै. म्हैबुब नदाफ यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त हेरवाडमध्ये उद्या हभप डॉ. सुहास फडतरे यांचे किर्तन
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
हेरवाड येथील पैगंबरवासी म्हैबुब नदाफ यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ विद्रोही कीर्तनकार, वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हभप डॉ. सुहास फडतरे महाराज (सातारा) यांचे कीर्तन बुधवार दिनांक २७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६:३० वाजता हेरवाड येथील कन्या विद्या मंदिर जवळ आयोजित करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पैगंबरवासी म्हैबुब नदाफ हे वारकरी संप्रदायाशी निगडित होते. त्यांनी कित्येकवेळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेतले आहे. विठ्ठल भक्त म्हणून ते हेरवाड मध्ये प्रसिद्ध होते. त्यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ विद्रोही कीर्तनकार, वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष हभप डॉ. सुहास फडतरे महाराज (सातारा) यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा