शिरोळमध्ये उडणार घोडा गाडी बैलगाडी शर्यतींचा धुरळा..!

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क  : 

येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरसानिमित्त आयोजित केलेल्या घोडागाडी व बैलगाडी शर्यती बुधवार दिनांक ३ जानेवारी ते शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ या कालावधीत मिठारगी शेतजमीन कनवाड रस्ता येथे होणार आहेत विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम कायम शिल्ड व चषक पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे अशी माहिती श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस संयोजन समितीच्या समितीच्या वतीने देण्यात आली.

 सोमवार दिनांक ४ डिसेंबर ते शुक्रवार ८ डिसेंबर २०२३ या कालावधीत ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस अमाप उत्साहात पार पडला यावर्षी उत्सव आणि उरूस साजरा करण्याचा मान संभाजीनगर येथील पवनपुत्र मित्र मंडळास मिळाला होता युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव आणि माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उत्सव आणि उरसाचे नेटके नियोजन केले होते उत्सव आणि उरसानिमित्त विविध स्पर्धा शर्यती कुस्त्यांचे जंगी मैदान धार्मिक आणि मनोरंजन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले पण उत्सव व उरुसाच्याअगोदर चार दिवस शिरोळ परिसरात मोठा पाऊस झाला होता यामुळे घोडागाडी व बैलगाडी शर्यतीसाठी तयार केलेल्या मैदानावर चिखल झाला होता यामुळे उत्सव आणि उरसानिमित्त आयोजित केलेल्या घोडागाडी व बैलगाडी शर्यती स्थगित करण्यात आल्या होत्या सदरच्या शर्यती शासनाची परवानगी घेऊन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार बुधवार ३ जानेवारी ते शुक्रवार५ जानेवारी २०२४ या कालावधीत शासनाच्या अटी शर्ती व सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार विना लाठी विना काठी शर्यती येथील मिठारगी शेतजमीन कनवाड रस्ता येथे घेण्यात येणार आहेत.

बुधवार ३ जानेवारी २०२४ रोजी गावातील बिनदाती दोनदाती बैलगाडी गावातील घोडागाडी गावातील दुबैली गाडी या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी खुला बैल पळवणे घोड्यावर बसून आणि गावातील कामठी बैलगाडी शर्यत आयोजित केली आहे तर शुक्रवार दिनांक ५ जानेवारी २०२४ रोजी जनरल घोडा गाडी शर्यत अ आणि ब गटातील जनरल दुबैली गाड्यांच्या विराट शर्यती होणार आहेत या शर्यतीमधील सर्व विजेत्यांना श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस समितीच्या वतीने रोख रक्कम कायम शिल्ड व चषक असे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे तरी या शर्यती पाहण्यासाठी सर्व शर्यतीशौकिकांनी आणि नागरिकांनी मिठारगी कनवाड रस्ता येथे उपस्थित रहावे असे आवाहन श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुस संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष