विकसित भारत संकल्प यात्रेचे शिरोळ शहरात उत्साहात स्वागत
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्प यात्रेच्या माध्यमातून शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना केंद्र शासनाच्या सर्व अनुदानाच्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोचविण्यासाठी उपक्रम राबविला आहे. या योजनांचा लाभ घेवून नागरिकांनी प्रगती साधावी असे आवाहन आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम यड्रावकर यांच्या हस्ते संकल्प यात्रेचा फीत कापून शुभारंभ करण्यात आला. विकसित भारत संकल्प यात्रे निमित्ताने केंद्र शासनाच्या लाभाच्या मंजूर योजनांच्या पत्रांचे वाटप आमदार डॉ राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. शिरोळ नगरपरिषदेच्या वतीने केंद्र शासनाच्या विविध शासकीय विकास योजनांची माहिती देवून मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी स्वागत केले. दिली.दरम्यान , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजनांची माहिती एलईडी स्क्रीन द्वारे दाखवण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव, मुकुंद गावडे, नरेंद्र माने, रावसाहेब देसाई, पंडित काळे, प्रकाश माळी,महेश देवताळे, नितीन शेट्टी, पृथ्वीराज माने - देशमुख , श्रीवर्धन माने - देशमुख ,सुनिल देशमुख , अमर माळी , धनाजी कोळी , चेतन पवार , कुमार चौगुले डॉ. दगडू माने यांच्यासह नगरपरिषद, शिरोळ तहसील ,शिरोळ पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी तसेच , शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा