अंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाल्याने बेडकिहाळ मध्ये डॉ विक्रम शिंगाडे यांचा नागरी सत्कार
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बेडकिहाळ येथील सामाजिक कार्यकर्ते व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला स्वतःला वाहून घेतलेले डॉ. विक्रम शिंगाडे यांना आत्मश्री प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्या वतीने डिसेंबर 6 रोजी कर्नाटक राज्यांचे माजी मुख्यमंत्री डी व्ही सदानंदगौंडा, माजी केंद्र सचिव, शोभा करंदाजी ,क्रुषी शेतकरी कल्याण राज्य सचिव कर्नाटक सरकार तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सी सोमशेखर आय.ए.एस.अधिकारी बेंगळुरू यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व मानधन देऊन आंतरराष्ट्रीय समाजभूषण गोल्ड स्टार अवार्ड, ने दिल्ली मधील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी मध्ये सन्मानित करण्यात आले. या उद्देशाने काल अमृत गार्डन येथे केंद्रीय संवाद पत्रकार संपादक कल्याणकारी संघटना न्यु दिल्ली व बेडकिहाळ गौरव समिती यांच्या वतीने डॉ विक्रम शिंगाडे यांचा नागरी सत्कार शमणेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलनाने झाली यावेळी .ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते शेखर प्रभात. एक्संबा, तसेच प्रकाश कदम प्रख्यात कवी व उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक शेखर प्रभात, प्रा डी.एन.दाभाडे, मलगोंड पाटील,बालासाब माने, वक्ते प्रकाश कदम, अड सनदी, अड खुट, सांगली ब्ल्यू पेंथर चे संस्थापक अध्यक्ष नितिन गोंधळी, दत्ता मांजरेकर, पत्रकार अजित कांबळे, अंनासाब कदम धनंजय खांडेकर व,मान्यवरांनी डॉ विक्रम शिंगाडे यांच्या परोप कारी कार्याचा आढावा घेतला. यावेळी उपस्थित मान्यवर व्यक्ती कडून डॉ विक्रम शिंगाडे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अजित धनापगोल, बी. जीं. देशमुख, अरुण यादव, महादेवी यादव, जगन यादव, राजु संकपाल,रावसाहेब मेल्लाले, सखाराम जाधव, आदिनाथ जाधव, संदीप पाटील, रावसाब कांबळे, उदय पांगिरे, सदलगा चे सामजिक कर्यकरते संतोष नवले सह परिसरातील शिंगाडे प्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अड प्रीती हत्तीमनी,तर आभार अजित कांबळे यांनी मानले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा