बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर पतसंस्था निवडणूक : कपबशी कोणाला मिळणार ? याकडे सर्वांचे लक्ष

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

जयसिंगपूर येथील बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर शिरोळ तालुका शिक्षक व शिक्षकेतर सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर या संस्थेची निवडणूक लागली असून १५ जागेसाठी ३१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. आज चिन्ह वाटप करण्यात येणार असल्याने सत्ताधारी आणि विरोधी गटाने कपबशी चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावा केला असून त्यामुळे कपबशी कोणाच्या हातात द्यायची हे मात्र निवडणूक निर्णय अधिकारी ठरवणार आहेत.

नियमाप्रमाणे एखादया गटाने ( पॅनेल) छाननी ते उमेदवारी अर्ज माघारी या कालावधीमध्ये कोणत्याही क्षणी निवडणूक कामकाजाच्या वेळी एकाच निवडणूक चिन्हाकरीता सामुहिक अर्ज करणे अपेक्षित आहे. तसेच गट ( पॅनेल ) निर्माण केल्याबाबत सर्व संबंधित उमेदवारांच्या स्वाक्षरीनिशी अर्ज प्राप्त झाल्यास अशा अर्जावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अचूक वेळ व तारीख नोंदवून "प्रथम आलेल्याला प्रथम प्राधान्य" या तत्वानुसार निवडणूक चिन्हाचे वाटप करावे. असे दि. २४ जून२०२२ च्या परिपत्रकात मार्गदर्शन केलेले आहे.मात्र बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर पतसंस्था निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सत्ताधारी गटाने अनेक उमेदवारांचे अर्ज पहिल्यांदा दाखल केले होते.त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कपबशी चिन्ह कोणाला देणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष