पै संग्राम पाटील यांनी डंकी डावावर पै सुबोध पाटील यास दाखविले आस्मान

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळचे ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त बुधवारी आयोजित केलेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीमध्ये पै संग्राम पाटील याने पै . सुबोध पाटील यास त्याने टाकलेला घुटना मोडून काढत डंकी डावावर विजय मिळवून हे कुस्ती मैदान मारले तर पै .श्रीमंत भोसले ,बाळू अपराध , वासिम पठाण यांनी आपल्या प्रतिस्पर्धी पैलवानांना चितपट करून विजय मिळवला उपस्थित मान्यवरांचे हस्ते विजयी पैलवानांना रोख रक्कम, चषक ,व चांदीची गदा पारितोषिक म्हणून देण्यात आली.

     बुधवारी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरुसानिमित्त येथील श्री बुवाफन महाराज मंदिरासमोरील कै .माजी आमदार दिनकररावजी यादव कुस्ती आखाडा येथे कुस्त्यांचे जंगी मैदान झाले या मैदानात लहान मध्यम मोठ्या अशा गटातील सुमारे१३० हून अधिक रोमांचक चित्तथरारक व प्रेक्षणीय कुस्त्या हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत पार पडल्या.

          या कुस्ती मैदानाचा शुभारंभ श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील , यांच्या हस्ते व अण्णासो पुजारी , युवानेते पृथ्वीराजसिंह यादव , दत्तचे संचालक दरगू गावडे ,रावसाहेब देसाई ,विजय आरगे , प्रकाश गावडे , मज्जिद आत्तार , कृष्णा भाट , बाळासाहेब कोळी ,बजरंग काळे ,देवाप्पा पुजारी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

                  या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या कुस्तीसाठी घोरपडी कुस्ती केंद्र पुणेचा पै संग्राम पाटील (सैन्यदल) आमशी विरुद्ध शिवरामदादा आखाडा पुण्याचा पै सुबोध पाटील (सैनिक टाकळी) यांच्यात रोमांचक आणि चित्त थरारक लढत झाली की लढत जवळपास १२ मिनिटे सुरू असताना पै सुबोध पाटील याने पै संग्राम पाटील याच्यावर घुटना डाव टाकून कब्जात घेतले पण चपळाईने पै संग्राम पाटील यांनी घुटना डाव उलटवत डंकी डावावर सुबोध पाटील यास आस्मान दाखवून शिरोळचे मैदान जिंकले

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती व्यंकोबा मैदान इचलकरंजीचा मल्ल व महाराष्ट्र चॅम्पियन पै श्रीमंत भोसले विरुद्ध हांडे पाटील तालीम सांगलीचा मल्ल मध्यप्रदेश केसरी पै सुदेश ठाकूर यांच्यात जवळपास २५ मिनिटे चाललेल्या कुस्तीमध्ये पै श्रीमंत भोसले याने एकलंगी डावावर पै सुदेश ठाकूर यावर विजय मिळवला तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पवार तालीम सांगलीचा पै बाळू अपराध विरुद्ध शहापुरी कोल्हापूरचा पै प्रवीण काळे यांच्यात १० मिनिटे कुस्ती होऊन बाळू अपराध याने घिस्सा डावावर प्रवीण काळे या चितपट केले चौथ्या क्रमांकाची कुस्ती वसंतदादा कुस्ती केंद्र सांगलीचा पै वासिम पठाण विरुद्ध दिल्लीचा पै प्रदीपकुमार यांच्यात लढत होऊन १० मिनिटे झालेल्या कुस्तीमध्ये वासिम पठाण याने बॅक थ्रो या डावावर प्रदीपकुमार यास मैदान दाखविले विजयी पैलवानांना उपस्थित मान्यवरांचे असते रोख रक्कम कायम चषक चांदीची गदा पारितोषिक म्हणून देण्यात आली.

    कुस्ती निवेदक पै शंकरराव पुजारी (कोथळी) यांनी आपल्या समालोचनाद्वारे कुस्तीचा इतिहास सांगत अनेक पैलवानांचे यश त्यांचे कुस्तीसाठी असणारे परिश्रम याची माहिती देऊन उपस्थित कुस्ती शौकिकांच्यामध्ये रोमांच उभे केले पै नंदू सुतार यांचे त्यांना सहकार्य लाभले तर हलगी वादक प्रशांत माने यांनी आपल्या हलगीच्या जोरावर पैलवानांना प्रोत्साहन देण्याबरोबरच हे मैदान खिळवून ठेवले टाळ्याचा गजर करत कुस्ती शौकिकांनी पैलवानांच्या डावांना दाद दिली.

          या कुस्ती मैदानात ज्येष्ठ पै रावसाहेब देसाई , शिवाजी मरळे ,देवाप्पा पुजारी ,दत्तात्रय माने , रघुनाथ धनगर ,सुभाष माळी , युवराज माने , बाबुराव पुजारी , अण्णासो पुजारी , रामा पुजारी ,गणीसो आत्तार, बापूसो आत्तार यांचा उत्सव व उरूस नियोजन समिती यांच्यावतीने सन्मान करण्यात आला.

       माजी नगरसेवक पै प्रकाश गावडे , आणि शिरोळ तालुका कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष मज्जिद आत्तार , संजय देबाजे ,इमाम पटेल , यांनी कुस्ती मैदानाचे उत्कृष्ट नियोजन केले पै रावसाहेब देसाई , देवाप्पा पुजारी ,गुरुनाथ भुशिंगे ,आयुब मेस्त्री , राजू कुंभार , नन्नू शेख ,सुभाष माळी , श्रीहरी वाघमारे , नवनाथ कुंभार ,बाळू खोंद्रे , अशोक चौगुले ,अमित पाटील, गुरु भूशिंगे ,स्वप्निल पाटील , शरद गोधडे यांनी पंच म्हणून पैलवानांना न्याय देण्याची भूमिका उत्कृष्ट निभावली .

            आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर ,माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील ,महाराष्ट्र केसरी पै नामदेव मुळे ,उपमहाराष्ट्र केसरी पै अमृता भोसले , भरत बँकेचे चेअरमन पै विठ्ठल मोरे , श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव , गजाननराव देसाई, माजी उपसरपंच हाजी बाळासाहेब शेख ,सचिन पाटील कणंगलेकर ,विकास पाटील ,कणंगलेकर युवा नेते किरण पाटील कणंगलेकर ,माजी नगरसेवक दयानंद जाधव ,इम्रान आत्तार , मोहन गुरव , धनाजी पाटील नरदेकर ,महेश पाटील , उल्हास उत्तम पाटील ,जयदीप थोरात , लालचंद माच्छेकर , संभाजीराव यादव , निळकंठ उर्फ पिंटू फल्ले ,बबन पुजारी ,बजरंग पुजारी महाराज , यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पैलवान आणि कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते

कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस संयोजन समितीचे आधारस्तंभ युवानेते पृथ्वीराजसिंह यादव ,माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे , उत्सव व उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे ,उपाध्यक्ष संतोष विटेकरी ,खजिनदार राहुल कोळी ,सचिव किरण जगताप ,ऑडिटर पिराजी जयान्नावर ,स्वागताध्यक्ष पिराजी हेरवाडे ,कार्याध्यक्ष संतोष घाडगे , संयोजक लखन कुंभार , सहसंयोजक सागर कांबळे ,सहस्वागताध्यक्ष संजय जगदाळे ,सहकार्याध्यक्ष संदीप कोळी ,सहखजिनदार कुमार जयान्नावर , नितीन कोळी , सहऑडिटर प्रताप जगदाळे, सहसचिव गणेश मोरे यांच्यासह पवनपुत्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले .

         एप्रिल महिन्यात होणार कुस्त्यांच्या जंगी मैदान

कुस्ती क्षेत्राला उर्जीतवस्था देण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या कै माजी आमदार दिनकररावजी यादव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त याच कुस्ती मैदानात एप्रिल महिन्यात शिरोळ तालुका कुस्तीगीर परिषद यांच्या माध्यमातून कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव यांनी केली .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष