माणकापूर येथे राकेश चौगुले कुटुंबियांच्या प्रयत्नाने मोफत गॅस किटचे वितरण
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
पंचायत अध्यक्षा व विद्यमान ग्राम पंचायत सदस्या सौ रूपाली चौगुले, ग्राम पंचायत सदस्या सौ अलका चौगुले तसेच ग्राम पंचायत सदस्य धनंजय चौगुले व चौगुले परिवाराच्या संयुक्त विद्यमाने प्रधान मंत्री उज्वल योजनेतून मोफत मंजूर करण्यात आलेल्या गॅस किटचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत समस्त चौगुले कुटुंबियांच्या शुभ हस्ते वितरीत करण्यात आले.
समाज कल्याणासाठी काही ना काही करत सतत जनतेच्या हितासाठी धडपडणाऱ्या युवा नेते धनंजय उर्फ राकेश चौगुले या युवकांने समाजातील गोरगरीब गरजू कुटुंबीयांना आजतागायत 240 गॅस कनेक्शनचे वाटप केले आहे.तसेच बहुतांश दरिद्री कुटुंबीयांना बीपीएल रेशन कार्ड मिळवून देऊन गरीब व विधवा महिलांचा उध्दार केला आहे.त्यातून आज या ठिकाणी 35 कुटुंबीयांना या मोफत गॅस किटचे वाटप करण्यात आले आहे.
निस्वार्थी कार्य आणि अंगी समाजसेवेची आस,यामुळे माणकापुर तत्कालीन ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत राकेश चौगुले सह पत्नी रूपाली,आई अलका चौगुले यांनी जनतेने दिलेल्या पाठिंब्यावर ग्राम पंचायतीच्या निवडणूकीत एकाच घरातून एकाच वेळी ग्राम पंचायतीवर तिघे निवडून येण्याचा विक्रम नोंदवला होता.त्याचीच प्रचिती आल्याने पुन्हा आज चौगुले कुटुंबियांच्या प्रयत्नांतून हे समाज कार्य नोंदवले जात असल्याचे माजी अध्यक्ष अभय चौगुले यांनी सांगीतले. यावेळी ज्येष्ठ नेते नाना माळी यांनीही मनोगत व्यक्त करत चौगुले कुटुंबीयांचे कौतुक केले.
याप्रसंगी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अभय चौगुले,सुधीर कांबळे,अनिल चौगुले,सुनिता चौगुले,शिवाजी चौगुले, रघुनाथ आरगे,सागर आरगे,पवनकुमार माने,अशोक जिरगे, आकाश कांबळे,पितांबर कारंडे,तसेच माने गॅस कंपनीचे व्यवस्थापक व लाभार्थी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा