एकतारी भजनी स्पर्धेत माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी व चिंतामणी भजनी मंडळ आरग प्रथम

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

   येथील ग्रामदैवत श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नुरखान बादशहा उरुसानिमित्त शुक्रवारी घेण्यात आलेल्या एकतारी भजनी स्पर्धेत माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी व चिंतामणी भजनी मंडळ आरग यांना विभागून प्रथम देण्यात आला त्यांना प्रथम क्रमांकाचे ११ हजार रुपयाचे पारितोषीक विभागुन देण्यात आले . तर मानाचे चषक ट्रॉफी दोन्ही मंडळात नाणेफेक करून वरती माता संतुबाई भजनी मंडळ काननवाडी यांना देण्यात आली .

     श्री बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरसानिमित्त शुक्रवारी सायंकाळी एकतारी भजनी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते रात्री उशिरापर्यंत ही स्पर्धा सुरू होती. स्पर्धेत द्वितीय क्रमांक - ७ हजार रुपये , ओमगणेश भजनीमंडळ आरळहट्टी , तृतीय क्रमांक - ५ हजार रुपये गिरलिंग भजनीमंडळ कुटकुळी , चतुर्थ क्रमांक - ३ हजार रुपये बसवेश्वर भजनीमंडळ खंडेराजुरी, तर पाचवा क्रमांक अवधुत आखाडा इंचलकरंजी व सचिदानंद भजनीमंडळ वाघवे यांना २हजार रुपयाचे पारितोषिक विभागून देण्यात आले . उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण सोहळा पार पडला या स्पर्धेत १६ संघानी सहभाग नोंदविला होता . यावेळी युवा नेते पृथ्वीराज यादव , विजय आरगे , दत्ताचे संचालक दरगू गावडे , रावसाहेब देसाई , माजी सरपंच गजानन संकपाळ , धनाजीराव पाटील - नरदेकर , बाळसाहेब कोळी , बापूसो गंगधर, माजी नगरसेवक पंडीत काळे , भगवान आवळे , दिलीप संकपाळ , पंडीत चुडमुंगे, वसंत चुडमुंगे, राजेंद्र खटावकर , नंदकुमार सुतार , सिताराम संकपाळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते . दत्तात्रय गंगधर , शिवाजी जाधव ( कवी ) विश्वास चुडमुंगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले . युवा नेते पृथ्वीराज यादव माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे निळकंठ उर्फ पिंटू फल्ले बुवाफन महाराज उत्सव व हजरत नूरखान बादशाह उरूस संयोजन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब जगदाळे ,उपाध्यक्ष संतोष विटेकरी ,खजिनदार राहुल कोळी ,सचिव किरण जगताप ,ऑडिटर पिराजी जयान्नावर ,स्वागताध्यक्ष पिराजी हेरवाडे ,कार्याध्यक्ष संतोष घाडगे , संयोजक लखन कुंभार , सहसंयोजक सागर कांबळे ,सहस्वागताध्यक्ष संजय जगदाळे ,सहकार्याध्यक्ष संदीप कोळी ,सहखजिनदार कुमार जयान्नावर , नितीन कोळी , सहऑडिटर प्रताप जगदाळे, सहसचिव गणेश मोरे यांच्यासह पवनपुत्र तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य मार्गदर्शक कार्यकर्ते उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष