विद्या मंदिर चिंचवाड शाळेचा प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक



जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

चिपरी केंद्रांतर्गत सन २०२३- २०२४ या शैक्षणिक वर्षातील सांस्कृतिक स्पर्धा केंद्र शाळा चिपरी येथे संपन्न झाल्या.या स्पर्धेतील वरिष्ठ गटातील प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्या मंदिर चिंचवाड शाळेने प्रथम क्रमांक मिळवला.यामध्ये कु.किर्ती रवि सातपुते,कु.श्रद्धा रामदास कदम,साईराज महादेव पाटोळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम क्रमांक मिळवला.

         या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक हरिदास घोळवे, सुभाष पडोळकर,संतोष ठोमके, संगीता चव्हाण,ज्योती ठोमके, सुषमा पाटील,आयेशा गोधडे यांचे मार्गदर्शन लाभले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष