शिरोळ तालुक्यात १० हजार २९५ मयत मतदारांची संख्या घटणार

शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक ०१ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दिनांक २७ ऑक्टोंबर ते ९ डिसेंबर अखेर पार पडला. या कालावधीत २८० शिरोळ विधानसभेच्या दिनांक २७ ऑक्टोंबर रोजी प्रसिध्द झालेल्या प्रारुप मतदार यादीवर नवीन मतदार नोंदणी, स्थलांतर अथवा तपशीलात बदल तसेच मयत, दुबार, स्थलांतरीत या कारणाने वगळणी करणेकरीता दावे व हरकती स्विकारणेत आल्या. मतदार यादीमध्ये नव्याने नावाची नोंद करणेसाठी (नमुना अर्ज ६) एकूण ३३५२ इतके अर्ज प्राप्त झाले तसेच स्थलांतर अथवा मतदार यादीमधील तपशीलात बदल करण्यासाठी एकूण ९५७ इतके अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच २१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी भेटी देऊन बीएलओ यांनी मतदारांची पडताळणी केली होती. त्यामध्ये १०२९५ इतके मतदार मयत असूनही त्यांचे नावाची नोंद मतदार यादीमध्ये असलेचे आढळून आले होते. अशा मयत मतदारांच्या नावाची वगळणीची प्रक्रिया निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यपध्दतीनुसार सुरु आहे. तरी सर्व नागरीकांनी बीएलओ यांचेशी संपर्क साधून मयत यादीची पडताळणी करुन घ्यावी. यात अनवधानाने एखादे नावाची वगळणी झालेली असलेस त्यांनी संबंधित यादी भागाचे बीएलओ यांचेशी संपर्क करुन नमुना नंबर ६ चा अर्ज तात्काळ भरुन द्यावा. जेणेकरुन त्यांचे नाव दिनांक ०५ जानेवारी २०२४ च्या मतदार यादीमध्ये समाविष्ट होईल.

२८० शिरोळ विधानसभा मतदार संघांतर्गत संगणक प्रणालीद्वारे शोधलेल्या १८३८ इतके PSE (छयाचित्र समान नोंदी) व ११७८ इतके DSE (नाव, वय समान असलेल्या नोंदी) आढळून आलेल्या आहेत. त्याकरीता पोष्टामार्फत तसेच बीएलओ यांचेमार्फत संबंधितांना नोटीसा रुजू करुन त्यांचे विहीत नमुन्यात जबाब घेण्याचे काम सुरु आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष