डिजिटल बोर्डांनी झाकले नृसिंहवाडीचे आरोग्यवर्धिनी केंद्र

 


नृसिंहवाडी / शिवार न्यूज नेटवर्क :

महाराष्ट्रातील प्रसिद्ध देवस्थान असलेल्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील आरोग्यवर्धिनी केंद्राच्या गेटवर तसेच समोरच्या बाजूस डिजिटल फलक लावण्यात आल्यामुळे सदरचे आरोग्य केंद्र झाकून गेले आहे. त्यामुळे ऐन दत्तजयंतीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना आरोग्य केंद्राची शोधा - शोध करावी लागणार आहे. त्यामुळे तातडीने ग्रामपंचायतीने सदरची डिजिटल बोर्डे काढावीत, अशी मागणी जोर धरत आहे.

 दत्त जयंती निमित्त श्री दत्तप्रभूंच्या दर्शनासाठी महाराष्ट्र देशभरातून अनेक भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. भाविकांच्या सेवेसाठी येथील आरोग्य केंद्राचे पथक सज्ज झाले आहे. मात्र, आरोग्य केंद्रच डिजिटल फलकात झाकून गेले असल्यामुळे रुग्णांना आरोग्य केंद्र शोधून सुद्धा सापडत नाहीये, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राजकीय पक्ष, व्यवसायासह काहीजणांनी डिजिटल बोर्ड लावले असल्यामुळे सदरची बोर्डे तातडीने काढण्यात यावीत, तशी मागणी आता जोर धरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष