आदमभाई मुजावर यांनी दिला आम आदमी पार्टीचा राजीनामा

 


जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :

   आम आदमी पाआम आदमी पार्टीचे शिरोळ तालुका समन्वयक आदमभाई मुजावर यांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच जाहीर केला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले, या पार्टीचा जन्म आंदोलनातून झाला आहे. आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी आंदोलन, मोर्चे, उपोषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न शासनासमोर मांडण्याचा व सोडविण्याचा प्रयत्न केला आहे व प्रत्येक पदाधिकाऱ्यांसह , कार्यकर्त्यांस जनतेचे प्रश्न सोडविण्याबाबत सुचना करण्यात आल्या आहेत. आज दिल्लीत व पंजाबमधे सत्तेत राहून सर्वसामान्य जनतेचे मुलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्यात आले. जेथे सत्ता नाही तेथे आंदोलनातून प्रश्न उपस्थित करून सोडविण्यात आले. 

      मी आदमभाई मुजावर आम आदमी पार्टीचा तालुका समन्वयक असताना शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याबाबत पदाधिकाऱ्यांचे सहकार्य न मिळाल्यामुळे आंदोलन, उपोषण, मोर्चे या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवू शकलो नाही. मला पदाधिकाऱ्यांकडून आंदोलन, मोर्चे, उपोषण करण्यास सहमती मिळत नसल्यामुळे मी आम आदमी पार्टीच्या शिरोळ तालुका समन्वयक पदाचा त्याग करीत आहे. 

      महाराष्ट्रात मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास आम आदमी पार्टीकडून पाठींबा देण्यात आला होता. पण शिरोळ तालुक्यातून आम आदमी पार्टीकडून प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल मी सदरचे आंदोलन स्वराज्यक्रांती जनअंदोलनाकडून केले. यामुळे आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यां कडून मराठा आरक्षण आंदोलनास तिव्र विरोध होत आहे. मी शिरोळ तालुक्यातील गरीब गरजवंत मराठा बांधवांवर अन्याय होत असलेबाबत आंदोलन केले होतो , करीत आहे व भविष्यात करणारच . भविष्यात आम आदमी पार्टीकडून शिरोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर आंदोलन, मोर्चे, उपोषण करण्यास सहमती मिळणार असेल तर मी आम आदमी पार्टीचा विचार करतो.

      मी आज प्रजासत्ताक दिनापासून आम आदमी पार्टीच्या शिरोळ तालुका समन्वयक पदाचा त्याग करुन या प्रजासत्ताक दिनापासून शिरोळ तालुक्यात प्रजासत्ताक राज्य निर्माण करण्यासाठी सामाजिक कार्य करीत राहीन.

आजच्या राजकीय घडामोडींवर देशामध्ये राष्ट्रीय स्तरावर अरविंद केजरीवाल व राज्य स्तरावर प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या आंदोलक नेतृत्वाचा आदर्श डोळ्यासमोर समोर ठेऊन सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष