हेरवाडमध्ये आज खिल्लार गाई - बैलांचे प्रदर्शन ; विजेत्यांना मिळणार हेरवाड केसरी किताब
हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
खिल्लार प्रेमी व एकता युवा ग्रुपच्या वतीने हेरवाड येथे आज शनिवारी सकाळी ९ वाजता खिल्लार गाईंचे व बैलांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून यामध्ये विजेत्यांना हेरवाड केसरीचा किताब देण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन संजय तेलनाडे यांच्या हस्ते होणार आहे.
ग्रामीण भागातील दूध उत्पादक शेतकरी तसेच ग्रामस्थांना देशी गाई व बैलांचे महत्त्व करावे यासाठी खिल्लार प्रेमी तसेच एकता युवा ग्रुप च्या वतीने नेहमी विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्याचे काम करीत असतात याचाच भाग म्हणून मकर संक्रांतीचे औचित्य साधून हेरवाड येथे भव्य खिल्लार प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कोसा खिल्लार, देशी विभागात आदत गट ओपन गाय गट , गाव गंन्ना गाय गटात आदत गट, ओपन गाय गट अशा विभागात स्पर्धा आयोजित करण्यात आली असून बैल गट चॅम्पियन विजेत्यास चांदीची गदा व पाच हजार रुपये रोख बक्षीस तर गाय गट चॅम्पियन विजेत्यास चांदीची गदा व पाच हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित द्वितीय तृतीय क्रमांकास ३००१ व २००१ अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा