हेरवाड येथे खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये विद्यार्थ्याला मारहाण ?

 संबंधित जिल्हा परिषद शिक्षकाविरोधात कारवाईची टांगती तलवार 

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

गेल्या अनेक वर्षापासून शिरोळ तालुक्यातील हेरवाड या ठिकाणी खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करून यामध्ये जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळेतील विद्यार्थ्यांची भरती करून सदरचे कोचिंग क्लासेस सुरू आहे. अगदी काही वर्षापासून या ठिकाणी निवासीची सोय सुद्धा करण्यात आली आहे. नुकतेच शासनाने खाजगी कोचिंग क्लासेसवर निर्बंध घालून नियमावली कडक केली असताना या ठिकाणी असणाऱ्या कोचिंग क्लासेसमध्ये एका शिक्षकाकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची तक्रार गटशिक्षण अधिकारी शिरोळ यांच्याकडे गेली असल्याने सदरच्या कोचिंग क्लासेसवर कारवाईची टांगती तलवार आहे. 

गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा परिषद विद्यार्थ्यांना चांगले व गुणवत्ताधारक शिक्षण देण्याचा बहाणा करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून १५ ते २० हजार रुपयांची फी आकारून जिल्हा परिषद विद्यार्थ्यांची या ठिकाणी बेकायदेशीर भरती करण्यात आली. विद्यार्थ्यांची हजेरी ज्या - त्या शाळेत आणि विद्यार्थी शिकायला आणि राहायला या कोचिंग क्लासेसमध्ये अशाप्रकारे गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. दरम्यान शासनाने खाजगी कोचिंग क्लासेसवर निर्बंध लादून नियमावली जाहीर केली असताना सदरच्या कोचिंग क्लासेसमध्ये एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण झाल्याची तक्रारही शिरोळ तालुक्यातील शिक्षण विभागाला गेली आहे. दरम्यान सदरचे कोचिंग क्लासेस हे एका जिल्हा परिषद शिक्षकाने सुरू केले असल्याचे समोर आले असून सदरच्या कोचिंग क्लासेसवर व शिक्षकावर कारवाई होणार का ? याकडे आता संपूर्ण शिरोळ तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष