बोरगाव येथे विद्यार्थी व पालक मेळावा संपन्न
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथील डॉ आंबेडकर नगर मध्ये समाजातील सरकारी व खासगी कर्मचारी यांच्यावतीने चेतना बौद्ध विहार बोरगाव या ठिकाणी समाजातील पहिली ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये प्रबोधनात्मक मेळावा घेण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ शिक्षणाच्या जोरावर देशात अमुलाग्र बदल घडवून आणलेला आहे. त्यासाठी आज विद्यार्थी व पालक यांच्यात शिक्षणाचे महत्त्व समजावे हा दृष्टिकोन समोर ठेवून बोरगाव येथील दलित समाजातील युवा सरकारी व खासगी कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रबोधनात्मक पालक व विद्यार्थी मेळावा घेण्यात आला. प्रारंभी महाकारुणी तथागत गौतम बुद्ध व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व आधुनिक भारताचे पितामह विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून बुद्धवंदनानी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य विजय शिंदे हे कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान होते. मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे प्राध्यापक पी डी पाटील म्हणाले की आज प्रगत समाजात आपण आहार घेणे जितके गरजेचे आहे, तितकेच शिक्षणाला देखील महत्त्व दिले पाहिजे. कारण शिक्षणाच्या बाजारीकरणात आपले स्थान टिकवायचे असेल तर गुणात्मक शिक्षण घेणे ही आज काळाची गरज बनली आहे. पालकाने वेळीच पाल्यावर चांगले संस्कारात्मक शिक्षण देणे अपेक्षित आहे. बालक, पालक शिक्षक हे आधुनिक भारत निर्माण करणारा दुवा आहे असे प्रबोधनात्मक मार्गदर्शन पाटील यांनी केले. समाजातील विद्यार्थी व पालकांना एकत्रित आणून समाज प्रबोधनाचे कार्य केले असल्याचे सदलग्याचे सरकार शाळेचे मुख्याध्यापक किरण शिंदे व ॲडव्होकेट सुनील शिंगे ,विजय शिंगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा आयोजन कमिटी कडून सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जालधर कांबळे यांनी केले तर स्वागत विजय महाजन व प्रास्ताविक रवींद्र मधाळे यांनी केले तर आभार महावीर कांबळे यांनी मानले. यावेळी समाजातील सरकारी व खासगी कर्मचारी, नगरसेवक व मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा