बोरगाव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम युथ फाउंडेशन चे थाटात उद्घाटन

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

  राज्य अल्पसंख्याक विभागातून अल्पसंख्याकांना विविध योजना देण्यात येत आहे. शिक्षण, आरोग्य विविध योजनांसाठी अधिक भर देण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांसह अल्पसंख्याक आरक्षणात येणाऱ्या सर्व नागरिकांसाठी प्रत्येक वर्षी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे .सीमा भागात या योजनांची माहिती देऊन अल्पसंख्याक समाज बांधवांचा विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असणार असल्याची ग्वाही अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा अधिकारी डॉ. अब्दुलरशीद मिर्जनावर यांनी दिली. ते बोरगाव येथे डॉ. एपीजे अब्दुल कलाम युथ फाऊंडेशनच्या उद्घाटना प्रसंगी ते बोलत होते .अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य सरदार अफराज होते.

पुढे बोलताना मिरजन्नावर म्हणाले, मुस्लिम समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी विविध योजना आहेत. समाज बांधवांनी आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे.तसेच अल्पसंख्याक विभागातून मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी कॉलेज उभारण्यात येत आहे. यामध्ये चिकोडी येथे लवकरच कॉलेज प्रारंभ करण्यात येत आहे. मुस्लिम बांधवांनी आपल्या मुलांना चांगले नागरिक घडवून त्यांना उच्च शिक्षण द्यावे. अब्दुल कलाम युथ फौंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्याला महत्त्व देऊन जात-पात भेदभाव न करता कार्य करावे .व्यसनमुक्त समाज निर्मिती करावे .आजचे युवक ही देशाची शक्ती आहेत.हे समजून सर्वांनी कार्य केले तर या फाउंडेशनचा उद्देश सफल होईल असे सांगितले.

अध्यक्ष फिरोज अफराज म्हणाले, डॉ.एपीजे अब्दुलकलाम यांच्या आदर्शाने शहरात सामाजिक कार्यात अग्रेसर राहावे या हेतूने येथील मुस्लिम समाजाचे सर्व युवक एकत्रित आल्याचे सांगितले.

अध्यक्ष सरदार अफराज यांनी, युवकांच्या माध्यमातून उत्तम समाज निर्मिती करण्यात मदत होत असते. येथील मुस्लिम बांधवांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी युथ फाऊंडेशनची स्थापना केली आहे. हे प्रेरणादायी आहे असे सांगितले. कार्याक्रमाची सुरवात वृक्षास पाणी घालून केले, यावेळी उपस्थित मान्यवरांचां मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

        कार्यक्रमास इचलकरजीतील उद्योजक कैश बागवान , वक्फ बोर्डाचे जिल्हाध्यक्ष अनवर दाडीवाले, अब्दुल कलाम फाउंडेशनचे सदलगा अध्यक्ष अझरुद्दीन शेख, चांदसाब सनदी,यूनुस मुल्ला डॉ.डी. आर. सय्यद ,उबेद एक्संबे, आताऊल्ला पटेल, पोपट कुरळे,बशीर अपराज ,बाळू अपराज ,मुसा आफराज ,संतोष सर , आयुब मकानदार, जमील आतार ,जमीर माणगावे,नदीम नालबंद, रमजान अपराज, सेक्रेटरी सलमान अफराज, नुर अफराज, बशीर मुजावर, भैया अफराज,सलीम अफराज, मौला मुल्ला, सदाम जमादार, इरपान शेख, आरिफ अफराज, निहाल अवटी, रमजान भाहिरुपी, अब्दुल शेख, तोशिफ अफराज, महंमद अली मोमीन, मौला अली शेख, कयुम मोमीन यांच्यासह युथ फाउंडेशनचे पदाधिकारी, मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अजित कांबळे यांनी केले तर आभार मंडळाचे अध्यक्ष फिरोज अफराज यांनी मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष