मराठा आरक्षण समर्थनार्थ २४ जानेवारी पासून जयसिंगपूरमध्ये बेमुदत धरणे आंदोलन : आदमभाई मुजावर
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने उपोषणे मोर्च झालेली आहेत. या सर्व आंदोलनामध्ये मोर्चामध्ये स्वराज्यक्रांती जनआंदोलनकडून वेळोवेळी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रभर मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व मराठा बांधव आरक्षणाच्या मागणीसाठी २० जानेवारीपासून मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या आंदोलनाच्या समर्थनात स्वराज्यक्रांती जनआंदोलनाच्या माध्यमातून शिरोळ तालुक्यातील ओबीसी बांधवांच्याकडून भाईचारा म्हणून जयसिंगपूर क्रांती चौकामध्ये आरक्षणाचे जनक लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मारकासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. शासनाने गरजवंत मराठा समाजास लवकरात लवकर न्याय द्यावा, अशी अपेक्षा ठेवत आंदोलन करण्यात येणार आहे .
याबाबतचे निवेदन पोलीस निरीक्षक जयसिंगपूर पोलीस ठाणे व तहसीलदार शिरोळ यांना देण्यात आल्याचे आदमभाई मुजावर यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा