सहकार क्षेत्राला सहकार्याची गरज - आम.शशिकला जोल्ले
बोरगाव येथे 108 शांतीसागर को-ऑप क्रेडिट सोसायटीचे थाटात
अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
संपूर्ण विश्वामध्ये एखाद्याच्या जन्मापासून मरणोत्तरापर्यंत राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात प्रत्येकाला प्रत्येकाच्या सहकार्याची गरज असते.अगदी तसेच एखाद्या सहकारी संस्थेला देखील सहकार क्षेत्रात सहकार्याची गरज असते.आणि सहकार्याची भावना जिथे निर्माण होते तिथेच नवी सहकार संस्था उदयास येत असल्याचे मत प्रतिपादन माजी मंत्री व निपाणी भागाच्या आमदार शशिकला जोल्ले यांनी केले.
बोरगाव येथे श्री 108 शांतीसागर को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या शुभारंभ प्रसंगी त्या उदघटक म्हणून बोलत होत्या.
प्रारंभी आचार्य 108 कुलरत्न भूषण महाराज व परमपूज्य संपादना महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आमदार शशिकला जोल्ले यांच्या शुभहस्ते फीत कापून या संस्थेचा शुभारंभ करण्यात आला तर हाल शुगर मल्टीस्टेट कारखान्याचे चेअरमन एमपी पाटील यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून ठेव पावतीचे वितरण करण्यात आले. संस्थाचालकांवरील विश्वास,प्रामाणिक व निस्वार्थी कार्य यामुळेच संस्थेला पहिल्याच दिवशी जवळपास 05 कोटींवर ठेव जमा झाली असल्याचेही संस्था व्यवस्थापकांनी सांगितले.
पुढे बोलताना आमदार शशिकला जोल्ले म्हणाल्या की, बोरगाव व पंचक्रोशीतील शेतकरी व कष्टकरी यांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्याचबरोबर व्यवसायिक व नोकरदार यांच्या हितदृष्टितून हालशुगर संचालक व बोरगाव नगरसेवक शरदराव जंगटे यांनी बोरगावच्या आर्थिकीकरणात जोड देण्यासाठी सहकार क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी श्री 108 शांतीसागर को-ऑप क्रेडिट सोसायटीची स्थापना केली असून लवकरच ही संस्था सहकार क्षेत्रात नक्कीच गरुड झेप घेईल असा विश्वास व्यक्त केला.
शहराला बाजारपेठाबरोबरच संप्रदायाचा दर्जा प्राप्त झालेला आहे अशा या शहरात सहकाराच्या माध्यमातून शांतीसागर नावाची आर्थिक पुरवठा करणारी सहकारी संस्था उदयास येऊ लागल्याने लवकरच संपूर्ण शहरवासीयांचा आर्थिक दर्जा उंचावणार असल्याचेही आशीर्वाचन आचार्य रत्न श्री 108 कुलरत्न भूषण महाराज यांनी केले तर परमपूज्य संपादना महास्वामीजी म्हणाले की,पतहीन माणसाची पत निर्माण करणारी संस्था म्हणजे पतसंस्था असते.त्यामुळे आशा पतसंस्था निर्माण झाल्यास संस्थेमार्फत कागदापेक्षा विश्वासाला महत्त्व देऊन आर्थिक पुरवठा करण्याची जबाबदारी ही संस्था चालकांनी उचलेली असते.त्यामुळे तेथूनच खऱ्या अर्थाने शेतकरी व गरजवंतांच्या आर्थिक उन्नतीचा प्रारंभ होतो.
उदघाटन प्रसंगी हालशुगर अध्यक्ष एम.पी.पाटील,उपाध्यक्ष पवन पाटील, जयानंद जाधव,ज्येष्ठ संचालक रामगोंडा पाटील,कल्लप्पा जाधव,आप्पासाहेब जोल्ले,सुकमार पाटिल-बुदिहाळकर, बाळासाहेब कदम,सुहास गुगे,श्रीकांत बंन्ने,रावसाहेब फराळे,जयकुमार खोत,अण्णा पाटील,सुनील लडगे,डॉ शंकर माळी,नगरसेवक दिगंबर कांबळे, मारुती निकम,बी.टी.वठारे,बाबासाहेब निकम,रमेश मालगावे,शिवाजी भोरे,बाबासाहेब चौगले,देव माळी, जमील अत्तार,अजित तेरदाळे,संस्थेचे संस्थापक चेअरमन शरदराव जंगटे, उपाध्यक्ष राजशेखर हिरेमठ,शितल आम्मनवर,धवल भिवरे,प्रकाश पाटील,अक्षय चौगुले,सुनील गोरवाडे, भूपाल महाजन,अर्जुन हुडेद,सौ भारती सातपुते,सौ पद्मश्री पाटील,बाळासाहेब जंगटे,प्रधान व्यवस्थापक निलेश पाटील,यांच्यासह विविध संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी मान्यवर व शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा