आई वडीलांचा सन्मान करा..जग तुमचा सन्मान करेल : सौ.मनिषा डांगे

 


कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

लाल बहाद्दुर विद्यालयाने शालेय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना कला,क्रीडा,सांस्कृतिक गुणासाठी व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे.शाळेत पाऊल ठेवताच संस्थेची शाळेविषयीची आत्मियता दिसुन येते.विद्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाला चालना देणारे हे विद्यालय आहे.असे गौरवोग्दार कुरुंदवाडच्या माजी नगराध्यक्षा सौ.मनिषा डांगे यांनी काढले.

      कवठेगुलंद (ता.शिरोळ ) येथील लाल बहाद्दुर माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रिडा पारितोषिक वितरण समारंभप्रसगी त्या बोलत होत्या.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री किसान सेवा शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री.सुरेशराव शहापुरे होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या,मुलांनी आपल्या आई वडीलांचा,गुरुजनांचा सन्मान केल्यास जग तुमचा सन्मान करेल.आपली शिक्षण,ज्ञान घेण्याची भुक कायम वाढवत ठेवावी असा सल्ला त्यांनी दिला.

     यावेळी विद्यालयात सुरु करण्यात आलेल्या डिजीटल क्लासचे उदघाटन सौ.डांगे यांच्या हस्ते करण्यात आले.वार्षिक क्रिडा स्पर्धेत वैयक्तिक,सांघिक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.पत्रकारदिनानिमित्त गणेशवाडीसह सात गावातील पत्रकार,छायाचित्रकार यांचा संस्थेचे अध्यक्ष सुरेश शहापुरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर केले.जादुगार शंशाक यांनी आपल्या जादुच्या प्रयोगानी विद्यार्थ्यांची मने जिंकली.

  कार्यक्रमाची सुरुवात आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमापुजन व दिपप्रज्वलन करुन करण्यात आली.स्वागत मुख्याध्यापक बी.आय.शेख यांनी केले.सुत्रसचांलन व्ही.एस.कांबळे यांनी तर आभार व्हि.आर.सनदी यांनी मानले.कार्यक्रमास विद्यालयाचे सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

हेरवाडमध्ये संशयित वस्तू आढळल्याने खळबळ..!

तेरवाड बंधाऱ्याजवळ शिरढोण हद्दीत १२ फूटाची मगर जेरबंद

श्री क्षेत्र नृसिंहवाडीत भेसळ खव्याचे वितरण ? ; भाविकांच्या आरोग्यास धोका, प्रशासनाचे दुर्लक्ष